राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) पक्षाने कामगार व महाराष्ट्र दिन केला साजरा हुतात्म्यांचे केले स्मरण तर कामगारांचा केला सत्कार

     आर्वी,दि.२:- राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) पक्षाने कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचीत्य साधुन गुरुवारी (ता.एक) संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणाचे बलीदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांना अभिवादन करुन स्मरण केले तर, विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेने नुसार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये, वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या मार्गदर्शनात, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वा आठवडी बाजारातील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी, आपल्या प्राणाची बाजी लावुन संयुक्त महाराष्ट्राची निव ठेवणाऱ्या हुतात्म्यांना मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तर, महाराष्ट्राला परिश्रमातुन प्रगतीकडे नेण्याकरीता रात्रंदिन झटणाऱ्या कामगारांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. यात, गवंडी कामगार राजेश येडणे, विजय शिरपुरकर, जिनींग प्रेसिंग कामगार जयंत गभणे, बांधकाम कामगार गणेश मुने, श्रीधर चतुर, गजानन अतकरी, आरोग्य विभागातील कंत्राटी कामगार वासुदेव सपकाळ, माथाडी कामगार कैलास मिसार, मोहन पोथीवाल, विठ्ठल शेरेकर, सलार सौदागर, सिध्दार्थ कळंबे आदिंचा समावेश आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधी सल्लागार ॲड. विशाल पुजारी, असंघटीत कामगार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अश्पाक शेख, तालुका अध्यक्ष अशोक धानोरकर, शहर अध्यक्ष दिलीप बोरकर, जिल्हा उपध्यक्ष शुभांगी कलोडे, तालुका अध्यक्ष माधुरी सपकाळ, कामगार तालुका अध्यक्ष रामचंद्र मारबते, संजय डोंगरे, सुरेंद्र वाटकर आदिंचा सुध्दा सत्कार करण्यात येवुन कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमीत्त शुभेच्छा देण्यात आल्या.

Back to top button