*** पारंपारीक तेरवीला फाटा देवुन स्मशान भुमी व शाळेच्या सौंदर्यीकरणाला मदतीचा हात *** बेढोणा येथील इमाने परिवाराचा समाज परिवर्तन घडवीणारा धाडसी निर्णय ***

आर्वी,दि.२०:- आपण विज्ञान युगात जगत असलो तरी लोक काय म्हणतील या भिती पोटी मनात नसल तरी रुढी परंपरां जपण्याचा प्रयत्न केल्याच जाते. मात्र बेढोणा येथील दामोदर इमाने परिवार याला अपवाद ठरला आहे. त्यांनी पत्नीच्या तेरवीवर खर्च केल्या पेक्षा त्याच खर्चात स्मशान भुमी व शाळेचे सौंदर्यीकरण करण्याचा लोकाभिमुख समाज परिवर्तन घडवीणारा धाडसी निर्णय घेवुन सामाजात एक आदर्श प्रथा पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केल्या जात आहे.
हिंदु संस्कृतीत व्यक्तीच्या निधनानंतर धार्मीक सोपस्कर पार पाडण्याची पुर्वापार रुढी व परंपरा आहे. यामध्ये दशकार्य, तेरवी, वर्षश्राध्द आदिंचा प्रमुख्याने समावेश होतो. मात्र जिवंत असतांना त्याच व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्या जाते. त्यांच्या आरोग्यावर खाण्या पिण्यावर खर्च करण्यासाठी मागे पुढे पाहतात. म्हातारी माणसे आपल्यावर ओझ असल्याच समजुन त्यांना वृध्दाश्रमात सुध्दा पाठवीण्यास मागे पुढे पाहत नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्या पुढे आहे.
मात्र माणुसकीला आपला धर्म माननारे बेढोणा येथील दामोदर इमाने यांनी त्यांच्या धर्मपत्नी नलीनी यांना आजारातुन बर करण्याकरीता पैशाची चितां न करता सगळे उपचार केले. मात्र शेवटी काळाने घाला घातलाच. गुरूवारी (ता.१८) अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. इमाने परिवाराने रितीरिवाजा प्रमाणे चालत आलेले प्राथमीक धार्मीक सोपस्कर पार पाडले. मंगळवारी (ता.३०) तेरवी करण्याचा निर्णय सुध्दा घेण्यात आला होता. मात्र माणुसकीलाच आपला धर्म माननारे दामेदर इमाने यांच मन याला तयार नव्हतं. शेवटी लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्यांनी तेरवीचा कार्यक्रम रद्द केला. आणी यावर होणारा संभाव्य खर्च अडगळीत पडलेल्या स्मशान भुमी व शाळेच्या सौंदर्यीकरणावर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. विकासात्मक लोकाभिमुख असलेल्या या निर्णयाचे परिसरातच नव्हे तर समाजात सुध्दा स्वागत केल्या जात आहे.