गावठी मोहा दारुची वाहतुक करणाऱ्यांना पोलीसांनी पकडले रंगे हाथ
१० लीटर गावठी दारु व दुचाकीसह ९४ हजाराचा मुद्देमाल केला जप्त

आर्वी,दि.१८:- पुलगाव मार्गाने दुचाकीने गावठी दारुची वाहतुक करणाऱ्या दोघांना पोलीसांनी नाकेबंदी करुन मोठ्या शिताफीने पकडून त्यांचेकडून १० लीटर गावठी दारु व दुचाकीसह ९४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी (ता.१७) रात्री अकरा वाजताचे सुमारास लगतच्या वखार मंडळा जवळ हि कारवाई करण्यात आली.
करण राजेश सोमकुवर (२२ वर्ष) व प्रथमेश धर्मपाल नंदागवळी (१८वर्ष) अशी आरोपींची नावे असुन ते लगतच्या सावळापुर येथील रहिवासी आहेत. दुचाकी वाहनाने शहरात मोठ्या प्रमाणात गावठी दारु येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यांनी बुधवारी (ता.१७) पुलगाव मार्गावरील वखार महामंडळाच्या गोदाम जवळ बेमालुम पणे सापळा रचला. रात्री अकरा वाजताचे सुमारास संशयीत वाहन पुलगाव कडुन येत असल्याचे दिसताच पोलीसांनी अडवीले आणी झडती घेतली असता त्यांचे जवळ १० लिटर मोहा दारु भरुन असलेली एक प्लॅस्टीकची पिशवी दिसुन आली. पोलीसांनी टि.व्ही.एस. कपंनीची ८० हजार रुपये किमंतीची मोपेड दुचाकी व १२ हजार रुपयाची १० लिटर दारु असा एकुन ९४ हजार रुपयाची मालमत्ता ताब्यात घेतली.
वर्धा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत ढोले, ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात पोहवा दिगंबर रुईकर, पो.अ. निलेश करडे, सुरजसिंग बावरी, सागर पाचोडे आदिंनी हि कारवाई केली.
या प्रकरणी पोलीसांनी आरोपीं विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा सह कलम ३(१), १८१,१३०/१७७ व मोटर वाहन कायद्या अन्वये गुन्ह्याची नोंद घेवुन पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शन सुरु केला आहे.