कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात “सुपर माईंड, सुपर फ्युचर, व्यक्तिमत्व विकास” प्रशिक्षण शिबीर संपन्न

आर्वी: येथील कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात “सुपर माईंड, सुपर फ्युचर व व्यक्तीमत्व विकास” या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे मंगळवारी (ता.१६) आयोजन करण्यात आले होते यातील तज्ञ प्रशांत श्रीस्वामी यांनी विघ्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कला व वाणीज्य कनिष्ट महाविध्यालयाचे प्रमुख प्रा. धर्मेंद्र राऊत हे होते तर, प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के हे प्रमुख अतिथी होते.
तज्ञ मार्गदर्शक प्रशांत श्रीस्वामी यांनी या शिबीरात, जागतिकीकरणामुळे बदलत्या जगात ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, स्पर्धेच्या या युगात महानगरीय विद्यार्थ्यां पुढे ग्रामीण भागातील विद्यार्थी कसा टिकेल. आदि विषयावर सखोल मार्गदर्शन केले .
प्रा. धर्मेंद्र राऊत यांनी, ’महाविद्यालयात शिकत असलेला विद्यार्थी जरी ग्रामीण पार्श्वभूमीचा असला तरी त्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय व येथील प्राध्यापक वर्ग सदैव कटिबद्ध आहे असे सांगुन, विद्यार्थी विकासासाठी उर्वरित शैक्षणिक सत्रात आणखी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याची माहिती दिली. तर, प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के ह्यांनी शिबिराच्या आयोजनासाठी आयोजकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. विशाल येलेकर यांनी करुन आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या डॉ.भावना माळोदे, प्रा.मोहन कुमरे, प्रा. हमीद शेख, प्रा.राजेंद्र ढगे, डॉ. गणेश मस्के, प्रा. नितीन शिरपूरकर, प्रा.लखन जाधव आदिं प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता महाविध्यालयाच्या विध्यार्थी मंडळाने व विध्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.