Maharashtraअपघात
सोसाट्याच्या वाऱ्याने तुटलेल्या विधृत तारेचा स्पर्श झाल्याने महिलेचा मृत्यु कारंजा (घा.) तालुक्यातील मदणी येथील घटना

कारंजा(घा.),दि.१४:- शेतात काम करीत असतांना अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने तुटलेल्या विधृत वाहीणीच्या जिवंत तारेला स्पर्ष झाल्यामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला. रवीवारी (ता.१४) दुपारी तिन वाजता मदणी येथे हि घटना घडली आहे. महावितरण कंपनीला याकरीता जबाबदार धरुण कारवाई करावी अशी कुटूंबीयांची मागणी आहे.
शालीनी भुयार (६० वर्ष) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव असुन ती शेतात काम करीत होती अशातच जोराचा वारा आला आणी महावितरण विभागाची विधृत पुरवठा करणारी जिवंत तार पडली. या तारेचा स्पर्श होताच तिचा जागीच मृत्यु झाला.
या प्रकरणी कारंजा पोलीसांनी पंचनाम करुन नोंद घेतली असुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू केला आहे.