*** पिएमश्री गांधी विध्यालयातील मेजर ध्यानचंद क्लब हाऊसचे झाले उद्घाटन *** टेबल टेनीसचा टेबल व कॅरम बोर्ड देवुन माजी विध्यार्थ्यांनी केली, इनडोअर क्लबला मदत *** तर, शिक्षकांनी वाढदिवसाला दिले कॅरम बोर्ड व चेसचे सेट ***

आर्वी,दि.१४:- आर्थीक प्रगती साधण्याकरीता शिक्षणाची जोड असायला पाहिजे आणी शिक्षण ज्या शाळेतुन घेतलं त्या शाळेच ऋृण फेडणे हि सुध्दा आपली जबाबदारी आहे याची जाण ठेवुन येथील पिएमश्री गांधी विध्यालयाच्या माजी विध्यार्थ्यांनी टेबल टेनीस खेळाचा टेबल व कॅरम बोर्ड दिला तर शिक्षकांनी सुध्दा आपला वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करुन विध्यालयाला कॅरम बोर्ड व चेसचे सेट देवुन आपली जबाबदारी पाडली. यामुळे परिपुर्ण झालेल्या विध्यालयातील मेजर ध्यानचंद क्लब हाऊसचे उद्घाटन ओएसजी टी टी अकॅडमी चे कोच ओम तिवारी यांच्या हस्ते शनिवारी (ता.१३) करण्यात आले. यामुळे विध्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विध्यार्थ्यांकरीता इनडोअर खेळ खेळण्याकरीता सुवीधा उपलब्ध व्हावी अशी संकल्पना पुढे आली. याकरीता माजी विध्यार्थ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. याला १९७२-७३ बॅचच्या मयुर जिरापुरे यांनी प्रतिसाद देवुन उच्च दर्जाचा टेबल टेनीचा टेबल दिला. तर, मोदी महात्मा यांनी तिन कॅरम बोर्ड देवुन आपले ऋृण फेडण्याचे प्रयत्न केले. तर, दुसरीकडे शाळेतील सहाय्यक शिक्षक न्याहारे यांनी दोन कॅरम बोर्ड आणी प्रमोद नागरे यांनी चेसचे पाच संच देवुन आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला.
प्राचार्य पायले व शिक्षकांनी शाळेला सर्व क्षेत्रात परिपुर्ण करण्याचा चंगच बांधला आहे. गत दोन वर्षा पासुन विध्यालयातुन शिक्षण घेवुन निघालेल्या माजी विध्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करुन यामध्यमातुन संपर्क साधणे सुरू करताच यश मिळु लागले. या पुर्वी सुध्दा अनेक माजी विध्यार्थ्यांनी विध्यालयाला विविध माध्यमातुन मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला. अशातच विध्यालयाने विध्यार्थ्यांकरीता इनडोअर खेळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. हि संकल्पना सुध्दा परिपुर्ण झाली आणी विध्यार्थ्यांकरीता इनडोअर क्लब उपलब्ध करणे सहज शक्य झाले.
यावेळी ओम तिवारी यांनी मार्गदर्शन करतांना, टेबल टेनिस खेळाने शारिरीक दृष्या कसे सुदृढ होवु शकतो हे समजावुन देत, आंतरराष्ट्रीय दर्जा पर्यंत कस पोहचता येवु शकते याची माहिती दिली. मात्र याकरीता परिश्रम घेणे गरजेचे आहे असा सल्ला दिला.
तत्पुर्वी, माजी विध्यार्थी मयुर जिरापुरे, मोदी महात्मा, ओम तिवारी यांचा शाल, श्रीफळ आणी स्मृती चिन्ह देवुन प्राचार्य विश्र्वेश्र्वर पायले, पर्यवेक्षीका ज्योती अजमीरे, संजय किटे, करण न्याहारे यांनी सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद नागरे यांनी केले तर, प्राचार्य पायले यांनी आभार मानले,
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी मंडळाने परिश्रम घेतले.