*** महसुल सेवक (कोतवाल) यांच्या आंदोलनाने धरला जोर *** शुक्रवार (ता.१२) पासुन बेमुदत काम बंद आंदोलन सुरू *** शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवुन चतुर्थ वेतन श्रेणी लागु करण्याची मागणी ***

आर्वी,दि.१२:- शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवुन चतुर्थ वेतन श्रेणी लागु करण्यात यावी या शिवाय इतर मागण्या मान्य करुन घेण्याकरीता शासकीय प्रशासन व नागरिकांमधील महत्वाचा दुव्वा असलेल्या महसुल सेवकांनी (कोतवाल) आंदोलनाचे हथीयार उपसले असुन शुक्रवार (ता.१२) पासुन विदर्भ महसुल सेवक संघटनेच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे तर नागपुर येथे धरणे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
गत दोनशे पंचेवीस वर्षापुर्वीच्या ब्रिटीश कालीन प्रशासना पासुन तर आताच्या शासकीय प्रशासना पर्यंत नागरिकांमधील महत्वाचा दुव्वा म्हणुन महसुल सेवक (कोतवाल) याची गणना केल्या जाते. कर वसुली असो, पंचनामे असो, जनगणना असो, निवडणुका असो, आपत्ती व्यवस्थापन असो, शासकीय योजना असो, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असो, गौण खणीजाची राखण असो आदी शासकीय कामे महसुल सेवकांकडून नियमीत पणे करुन घेतल्या जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकी मुळे गौण खणीज आदिंची चोरी झाली तर सर्व प्रथम महसुल सेवकांवर कारवाई केल्या जाते. मात्र रात्रंदिवस राबुन २४ तास शासकीय जबाबदारी पाडत असतांना सुध्दा आजही त्याची गणना नौकरात केल्या जात आहे हा त्यांच्यावर अन्याय आहे.
महसुल सेवकांना या अन्यायातुन मुक्त करण्याकरीता महाराष्ट्र राज्य महसुल सेवक संघटनेने कंबर कसली. संघटनेच्यावतीने निवेदन देवुन, महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा व वेतन श्रेणी मिळावी. तलाठी व महसुल सहाय्यक पदामध्ये हक्काचे २५ टक्के आरक्षण मिळावे. नियमित वेतनश्रेणी व सेवासुविधा लागू कराव्यात याशिवाय अन्य मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या होत्या. यावर ७ आगष्टला महसुल व वन विभागाचे अपर सचीव विकास खारगे, सहसचीव संजय बनकर, कार्यासन अधिकारी शितल माने, आदिं सोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुध्दा घेण्यात आली मात्र मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध कारणे पुढे करुन मागण्या फेटाळल्या.
यामुळे संतप्त झालेल्या महसुल सेवकांनी आंदोलनाचा पवीत्रा उचलाला असुन बुधवारी (ता.१०) काळ्या फिती लावुन निषेध करीत काम केले. गुरूवारी (ता.११) तालुका स्तरावर एक दिवशीय धरणे आंदोलन केले. तर, शुक्रवार (ता.१२) पासुन बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असुन महसुल मंत्रीच्या आवारात धरणे आंदोलन करण्याची तसेच साखळ उपोषण करण्याची तयारी सुध्दा त्यांनी चालवीली आहे.
गुरुवारी (ता.११) आर्वी तहसील कार्यालया पुढे महसुल सेवक संघटनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष स्वराज जिलठे, उपाध्यक्ष उमेश वैध्य यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष चिरंजीव बत्रा, उपाध्यक्ष प्रशांत खोडे, सचिव मनोज नाखले, महसुल सेवक नारायण मडावी, मंगेश सघर, राहुल साठे, अर्जुन दांडेकर, अंकुश पवार, कांतेश्र्वर सोनुने, संदिप देऊळकर, रोषन मोहीते, सुरज वरकड, प्रशांत खोडे, नरेंद्र गोंगे, स्नेहल मनवर, प्रमोद केवट, अभिजित जगताप, आशिष ढाणके, अमोल खंडारे, विश्वनाथ कासार, पंकज कावळे, मनोज नाखले, मनीराम गावंडे, पुरूषोत्तम किहरनाके, सुशिला गेडाम आदिंनी धरणे आंदोलन करुन तहसीलदार हरिष काळे यांना मागणीचे निवेदन सुध्दा दिले आहे.