***लायन्स कल्ब व राणे हॉस्पीटलच्यावतीने रक्तदान व मोतीयाबिंदु तपासणी शिबीर संपन्न *** ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, ७५ ची नेत्र तपासणी तर १५ ची शस्त्रक्रीये करीता झाली निवड ***

आर्वी,दि.११:- लायन्स क्लब व राणे हॉस्पीटलच्या संयुक्त विध्यमाने बुधवारी (ता.१०) रक्तदान व मोतीयाबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर, ७५ शिबीरार्थींची नेत्र तपासणी करण्यात आली यातील १५ रुग्णांची मोतीयाबिंदु शस्त्रक्रीयेकरीता निवड करण्यात आली.
येथील आयनोक्स हॉल मध्ये झालेल्या या शिबीराचे उद्घाटन लायन्स इंटरनेशनल क्लबचे माजी प्रांतपाल व आर्वी शाखेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रिप्पल राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन केले. यावेळी ॲड. सुरेंद्र जाने, प्रमोद नागरे, निलेश लाडके, पंकज गोडबोले, सुशील अवचार, प्रा. देशमुख, डॉ. कालिंदी राणे, प्रा.डॉ. दिपक चव्हाण, संगीता ढबाले, सुनिता जाणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबीरात सहभागी झालेल्या ७५ रुग्णांची सेवाग्राम रुग्णालयाच्या नेत्रतज्ञांनी तपासणी केली यातील १५ शिबीरार्थीची निवड मोतीयाबिंदु शस्त्रक्रिये करीता करण्यात आली. त्यांना सेवाग्रामच्या नेत्र रुग्णालयात पाठवीण्यात आले. तर, इतरांना डोळ्यांचे ड्रॉप्स व औषधीचे मोफत वितरण करण्यात आले. याशिवाय रक्तदान करणाऱ्या ३५ दात्यांचे रक्त यवतमाळ येथील एकनील ब्लड बँकेच्या तज्ञांनी गोळा केले. डॉ. रिपल राणे व यवतमाळ रक्त पेढीचे संचालक सागर तोडकर यांनी रक्त दान करणाऱ्या रक्तदात्यांना भेट वस्तु देवुन त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता लायन्स क्लबचे पदाधिकारी, राणे हॉस्पीटलच्या परिचारीका, कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.