Maharashtraशैक्षणीक

माजी विध्यार्थी तथा कॉर्डीओथेरॉसीस सर्जन डॉ. आनंद संचेती यांचा सत्कार  

विध्यालयात मिळालेले अभ्यासाचे धडे व संस्कारामुळेच मला प्रगती साधता आल्याची दिली कबुली.

            आर्वी,दि.३- नागपुर येथील प्रसिध्द न्यु इरा हॉस्पीटलचे संचालक तथा माजी विध्यार्थी कॉर्डीओथेरॉसीस सर्जन डॉ. आनंद संचेती यांचा मंगळवारी (ता.दोन) येथील गांधीविध्यालयात शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विध्यार्थ्यांसोबत संवाद साधत, शाळेत मिळालेल्या अभ्यासाचे धडे व संस्कारामुळेच मला प्रगती साधता आली अशी कबुली दिली.

पीएमश्री गांधी विध्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य विश्वेश्वेर पायले हे होते. तर, प्रा. नितीन बोडके, विजय जवादे, प्रा विजय शेंडे, कैलास कुऱ्हाडे हे प्रमुख अतिथी होते.

डॉ. संचेती यांनी सत्काराला उत्तर देतांना, सन १९८१ ते १९८७ दरम्यान वर्ग पाच पासुन तर दहावी पर्यंत विध्यालयात शिक्षण  घेतांना आलेल्या अनुभवाचा उल्लेख केला. अनेक प्रसंगांना उजाळा दिला आणी प्रेरणादायी आठवणी विध्यार्थ्यांसमोर मांडल्या. आज मी जी प्रगती साधली त्यामागे केवळ आणी केवळ विध्यालयामधुन मिळालेल्या संस्काराचा मोठा वाटा असल्याची कबुली दिली. तसेच विध्यार्थ्यांनी आपले जिवन घडवीण्याकरीता अभ्यासा सोबतच खेळाला सुध्दा प्राधान्य द्यावे असा संदेश दिला.  प्राचार्य पायले यांनी सुध्दा यावेळी समयोचीत मार्गदर्शन केले.

  एनसीसी पायलट कु. श्रावणी शेंडे आणी कु. समृध्दी राठोड या एनसीसी पायलटने त्यांना मंचावर आणले. तसेच एनसीसी छात्र सैनिकांनी त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे ते गांधी विध्यालयात शिकत असतांना एनसीसी पथकाच्या सिएसएम रँकवर होते व विविध प्रकारच्या राष्ट्रीय शिबीरात सुध्दा सहभागी झाले होते. त्यांनी एनसीसी कार्यालयाला भेट देवुन शाळेच्या भेट पुस्तीकेत सकारात्मक अभिप्राय नोंदवुन शाळेच्या प्रगतीकरीता मदत करण्याचे आश्वासन सुध्दा दिले.

कार्यक्रमाचे संचालन प्रमोद नागरे यांनी करुन आभार  मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता, विध्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button