***भक्तांच्या सहभागाने आज निघणार रामदेव बाबाची रथ यात्र *** सलग शंभर वर्षा पुर्वी पासुन सुरू आहे परंपरा***

आर्वी,दि.३:- भादवा उत्सवा निमीत्त बुधवारी (ता.३) दुपारी पाच वाजता रामदेव बाबा यांच्या पदुकाची यात्रा पारंपारीक पध्दतीने घोड्यांच्या लाकडी रथा मधुन निघणार आहे. गत शंभर वर्ष पुर्वी पासुनची सुरू असलेली हि परंपरा कायम ठेवण्याच काम साखरे परिवार व
भक्तांच्यावतीने केल्या जात आहे.
भ्रद्रपद महिण्यात संत रामदेव बाबा यांचा भादवा उत्सव भक्तगण विविध धार्मीक कार्यक्रमाच्या माध्यमातुन साजरा करतात बुधवारी (ता.३) भाद्रपद सुदी ११ ला याची सांगता रथयात्रेने केल्या जाते. या रथयात्रेत घोड्याच्या लाकडी बग्गीमध्ये संत रामदेव बाबा यांच्या पादुका विराजमान असतात या बग्गीच्या खालुन निघत भावीक भक्त त्यांचा आशिर्वाद घेतात. याशिवाय संत डालीबाई यांच्या समाधीची प्रतीकृती व लीले घोडे यांना विराजमान केलेल्या बग्गींचा सुध्दा यात समावेश असतो.
ढोलताशांच्या गजरात व भजन मंडळीच्या पुढाकारात भक्तीभावाने कस्बा मंदिरातुन निघणारी हि रथ यात्रा माजी नगराध्यक्ष स्व. भाऊ ठाकुर यांच्या घरासमोरुन, मायबाई मंदिर, कासाबाई ढोले, दगडी पुल, तात्याजी महाराज मंदिर, बालाजी मंदिर, जैन मंदिर, सराफा लाईन, गणपती मंदिर, खडकपुरा, पंचायत समिती कार्यालय, विठ्ठल मंदिर, घोड्याच मंदिर, पद्मावती चौक, शिवाजी चौक, गांधी चौक आदि मार्गानी परिक्रमणाकरीता शेवटी कस्बा येथील रामदेव बाबा मंदिरात या यात्रेचे समारोप होणार आहे.
शहराचे दैवत रामदेव बाबा यांच्या या सोहळ्याचा आनंद व आर्शीवाद घेण्याकरीता भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने रथ यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात येत आहे.