***गणेश उत्सवा निमीत्त विठ्ठल वार्डात रक्दान शिबीराचे आयोजन**** ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान**** आमदार सुमीत वानखेडे व सामाजीक कार्यकर्ते आगरकर यांनी शिबीराला दिली भेट***

आर्वी,दि.१:- विठ्ठल वार्डातील श्रीराम गणेश उत्सव समिती व मित्र परिवाराने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर, आमदार सुमीत वानखेडे व युवा सामाजीक कार्यकर्ते मनोज आगरकर यांनी शिबीराला भेटी दिल्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद व्दिगुणीत झाला.
गत अनेक वर्षा पासुन श्रीराम गणेश उत्सव समिती व मित्र परिवाराच्यावतीने मोठ्या उत्साहात, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन गणेश उत्सव आनंदात व शांतते साजरा केल्या जातो. मानवी जिवनाला रक्ताची अत्यंत गरज आहे गरजेच्यावेळी नेमाका याचा तुटवडा निर्माण होतो याची जाण ठेवुन या मंडळाच्या कार्यकत्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान असलयाची भावना ठेवुन रक्तदान केले.
शिबीर यशस्वी करण्याकरीता नितीन मेश्राम, देवेंद्र तळेकर, शुभम सूर्यवंशी, ज्ञानदीप विजयकर, निखिल डोरले, अक्षय मुंदाने, गोलू देशमुख, गोपाल सूर्यवंशी, अंकित ढोले, सुबोध दळवी, प्रज्वल तळेकर, हिमांशू आहुजा, धीरज भिवगडे, मनोज पाटील, अभी कुबेटकर, रक्तदान शिबिराला 52 जणांनी केले रक्तदान सर्वांचे आभार व समस्त सदस्य श्रीराम गणेशोत्सव समिती