रामदेव बाबा उत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम **** भादवी मेळावा उत्सवा निमीत्त विध्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप

आर्वी,दि.३१:- रामदेव बाबा उत्सव समितीच्या माध्यमातुन आयोजीत “भादवी मेळावा उत्सवा” निमीत्त येथील पीएमश्री शिवाजी प्राथमीक शाळेच्या एकशे पन्नास विध्यार्थ्यांना शनिवारी (ता.३०) शैक्षणीक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र प्रसंशा केल्या जात आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत्त शिक्षक तथा माजी नगरसेवक प्रेमराज पालीवाल हे होते तर, उध्योजक मोहन चांडक, तरुण दवे, रमेश गहलोत, अमित पालीवाल आदि प्रमुख अतिथी होते.
यावेळी प्रेमराज पालीवाल यांनी मार्गदर्शन करतांना, विध्यार्थ्यांची प्रगती म्हणजेच्या देशाच्या व सुसंस्कृत समाज निर्माण करण्याच्या प्रक्रीयेचा पाया असल्याचे सांगुन पुर्वीची शिक्षण पध्दती व आताच्या शिक्षण पध्दतीमध्ये झालेल्या अमुलाग्र बदलावर प्रकाश टाकला.
रामदेव बाबा उत्सव समितीच्यावतीने गत अनेक वर्षा पासुन भाद्रपद महिण्यात दहा दिवसाच्या भादवी मेळाव्याचे आयोजन केल्या जाते या दरम्यान विविध धार्मीक कार्यक्रमासोबतच सामजीक कार्याची जोड सुध्दा दिल्या जाते. त्याचाच एक भाग म्हणुन नगर परिषदेच्या माध्यमातुन शिवाजी वार्डात चालवील्या जात असलेल्या शिवाजी प्राथमीक शाळेतील विध्यार्थ्यांमध्ये शैक्षणीक रुची वाढावी या उद्देशाने १५० विध्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणीक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापीका व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देवुन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावणा शाळेच्या मुख्याध्यापिका पद्माताई चौधरी यांनी मांडली. संचालन महेश मते यांनी केले. तर, आभार राहुल कोरडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता पुजा धरमठोक तथा समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.