व्हालीबॉलच्या शासकीय तालुका क्रीडा स्पर्धा संपन्न
या स्पर्धेत मुलींच्या २२ तर, मुलांच्या २४ संघांनी आपला सहभाग नोंदवीला

आर्वी,दि.२९:- युवकांमध्ये खेळ भावना वाढीस लागावी याकरीता शासनाच्या क्रिडा विभागाच्यावतीन येथील तालुका क्रीडा संकुलनाच्या मैदानावर व्हॉलीबॉलच्या शासकीय तालुका क्रीडा स्पर्धेचे गुरूवारी (ता.२८) आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील मुलींच्या २२ तर मुलांच्या २४ संघानी आपला सहभाग नोंदवीला.
या स्पर्धेचे उद्घाटन वाहतुक पोलीस प्रदिप खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुहास ठाकरे, तालुका क्रिडा संयोजक धिरज शिसोदे, तालुका क्रिडा मार्गदर्शक अनील चव्हाण, मार्गदर्शक प्राशीक जाधव, व्यवस्थापक वैभव काळे, निखील जाधव, निलेश कडू, अमोल नागपुरे, विक्रम विरुळकर, नागेश चेले, शेळके, प्रतीक वानखेडे हे प्रामुख्याने उपस्थीत होते.
दोन वयोगटात विभागुन घेतलेल्या या स्पर्धेत १४ वर्षाच्या आतील वयोगटाच्या चार, १७ वर्षाच्या आतील वयोगटाच्या पाच महिला चमुनी सहभाग घेतला होता. तर, १४ वर्षाच्या आतील वयोगटाच्या सात आणी १७ वर्षाच्या वयोगटातील मुलांच्या आठ चमुनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत नांदपुर येथील मॉडेल हायस्कुलच्या १४ वर्षाच्या आतील मुलीच्या संघाने अंतीम सामन्यात विजयी प्राप्त केला तर, रोहणा येथील मॉडेल हायस्कुलच्या १७ वर्ष वयोगटातील मुलीच्या संघाने अंतीम सामन्यावत विजय प्राप्त केला. तर, आर्वीच्या मॉडेल कनीष्ठ विध्यालयाच्या मुलांच्या संघाने १९ वर्ष वयोगाटाच्या अंतीम सामन्यात बाजी मारली. मात्र या दरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामने होवु शकले नाही परिणामी त्यांना तात्पुरते स्थगीत ठेवण्याचा निर्णय नागेश चेले व निखील जाधव यांनी घेतला आहे.