Maharashtraधार्मीक कार्यक्रम

ईद व गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शांतता समितीची झाली मिटींग डिजेचा आवाज, मोकाट जनावरांचा हौदोस व गांजा विक्री वर उठले प्रश्न

आर्वी, दि.२८:- ईद-मिलाद- दुन्नबी व गणेश उत्सव निर्विधनपणे पार पडावे याकरीता आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील शांतता समितीची मिटींग बुधवारी (ता.२७) येथील प्रशासकीय इमारती मध्ये झाली. यात डिजेच्या आवाजावर निर्बंध, मोकाट  जनावरांचा हौदोस व वाढत्या गांज्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात प्रश्र्न निर्माण करण्यात आले.

विधान परिषद सदस्य आमदार दादाराव केचे, विधान सभा सदस्य आमदार सुमीत वानखेडे, वर्धा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपविभागीय अधिकारी विश्र्वास शिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले, तहसीलदार हरिष काळे, ठाणेदार सतीश डेहणकर तथा आष्टी, तळेगाव, कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार, पत्रकार व शांतता समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थीत होते.

यावेळी आमदार दादाराव केचे यांनी पोलीसांना सुचना करतांना मोकाट जनावरांचा प्रश्न उपस्थीतत करुन त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच ईद असो गणेश उत्सव असो याशिवाय येणारे अन्य उत्सव सुध्दा शांततेत पार पाडण्याकरीता पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवावा, गणेश विसर्जनाच्या ठिकाणी अपघात घडू नये या करीता लाईटींगची व बचाव पथकाची नियुक्ती करावी असे सांगीतले.

आमदार सुमीत वानखेडे यांनी मार्गदर्शन करतांना, सण, उत्सव म्हटल कि उत्साह असतोच अशात डिजे व लेझर लाईटींगचा वापर शक्यतो टाळण्यात यावा असे सांगीतले आणी वापर केलाच तर आवाजावर निर्बंध ठेवल्या गेल पाहिजे अशी सुचना सुध्दा केली. पोलीसांनी सुध्दा कारवाई करतांना सयंम पाळणे आवश्यक आहे. काही तरुणांनी रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने डिजी घेतले आहे त्यांना सुध्दा व्यवसाय मिळायला पाहिजे याची दक्षता घेतल्या गेली पाहिजे असा सल्ला दिला.

पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी सण उत्सव शांततेत पार पाडण्याकरीता पोलीस विभाग सर्तक असल्याचे सांगुन, गणेश मंडळ असो अथवा ईद-मिलाद-दुन्नबी कार्यक्रमाचे पदाधिकारी असो यांनी सुध्दा सतर्क राहणे गरजेचे आहे अशी सुचना केली. याकरीता स्वयंसेवकांची फळी उभी करणे, शासनाच्या सुचने प्रमाणे मंजुरी घेणे, डिजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवणे, धोका दायक लेजर लाईटचा उपयोग टाळणे, असामाजीक तत्वांचा शिरकाव मिरवणुकीत होवू न देणे आदिंवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे असे सांगीतली आणी अस काही आढळल्यास त्वरीत पोलीसांना माहिती देण्यात यावी असे आवाहन केले. याशिवाय बातमीदार दशरथ जाधव, लक्ष्मीकांत साखरे, सचीन होले,  हरिभाऊ धोटे, आदिंनी सुध्दा आपले मत मांडले.

     उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर ढोले यांनी, शातंता भंग होवु नये या करीता तडीपार करण्याची कारवाई करण्यात येत  असल्याचे सांगीतले. याशिवाय  विसर्जन करतांना खोल पाण्यात जावु नये, डिजेचा वापर टाळावा, मानवाला घातक असलेल्या लेजर लाईटचा वापर तर अजीबात करु नका आदी सुचना दिल्या

 ठाणेदार सतीश डेहणकर यांनी प्रस्तावणा मांडतांना, गणपती मंडळाची माहिती देवुन अनेकांनी मंजुरी घेतली नसल्याचे निर्देशनात आणुन देवुन त्वरीत मंजुरी घेण्याच्या सुचना केल्या आणी बंदोबस्ताची माहिती दिली तर, महसुल विभागाचे सागर झाडे यांनी संचालन करुन आभार मानले.

कार्यक्रमाला आर्वी, आष्टी, कारंजा येथील गणेश मंडळाचे व ईद-मिलाद-दुन्नबी कमेटीची पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येत उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button