नंदीपोळ्याच्या दिवशी पोलीस सजग पन्नास लिटर मोह दारु जप्त केली मात्र आरोपी झाला फरार

आर्वी,दि.२३:- नंदीपोळा आनंदात पार पडावा याकरीता सजग असलेल्या पोलीसांनी गस्तीवर असतांना लगतच्या सावळापुर येथील एका घरावर धाड टाकुन ५० लीटर मोहा दारु जप्त केली. परंतु चाहुल लागल्यामुळे आरोपीने पलायन केले. शनिवारी (ता.२३) दुपारी हि कारवाई करण्यात आली.
पलायन केलेल्या आरोपीचे नाव विक्की मेश्राम असे असुन तो सावळापुर येथील रहिवासी आहे. येणारे सण आनंदात साजरे व्हावे या करीता उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले, ठाणेदार सतीश डेहणकर यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गस्तीवर लावले आहे. त्यांच्या या आदेशाचे पालन करीत पोहवा पालसाहेब जाधव, पो.ना. किशोर साटोणे, पो.कॉ. निलेश चव्हाण हे शनिवारी (ता.२३) गस्तीवर होते या दरम्यान सावळापुर येथील एका घरात मोठ्या प्रमाणात गावठी दारुचा साठ असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी धाड टाकली मात्र तत्पुर्वीच चाहुल लागल्यामुळे विक्की मेश्राम यांने पलायन केले. यावेळी पाहणी केली असता स्वच्छालयात एका रबरी ट्युब मध्ये ५० लिटर भरुन ठेवलेली दारु आढळुन आली. पोलीसांनी पोलीस पाटील व एका पंचाच्या समक्ष ती ताब्यात घेतली.
या प्रकरणी विक्की मेश्राम यांच्या विरोधात विविध कलमान्वय गुन्ह्याची नोंद घेवुन पोलीसांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई सुरू केली आहे.