Maharashtraधार्मीक कार्यक्रम

संगीत नृत्याची लयलुट तर, डिजेच्या तालावर थीरकली तरुणाई देवाभाऊ दहीहंडी स्पर्धा व सांस्कृतीक महोत्सव उत्साहात पार पडले  धामणगाव फ्रेंडसने प्रथम तर, शिवतांडव शिरजगाव (बंड) ने पटकावीले दुसरे बक्षीस

स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न फसला

आर्वी,दि.२१:- स्व. यादवराव केचे यांच्या स्मृती पित्यार्थ विधान परिषद सदस्य आमदार दादाराव केचे यांनी आयोजीत केलेली देवा भाऊ दहीहंडी स्पर्धा बुधवारी (ता.२०) मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे एक लाख ५१ हजाराचे प्रथम पारितोषक धामणगाव येथील फ्रेंडस ग्रुप पथकाने तर, एकाहत्तर हजार १०१ रुपयाचे दुसरे पारीतोषीक शिरजगाव (बंड) येथील शिव तांडव पथकाने पटकावीला, यावेळी नागपुर येथील आकाश तायवाडे यांच्या ग्रुपने संगीत नृत्याची लयलुट केली तर, डिजेच्‍या तालावर थीरकणाऱ्या तरुणाईने यात चांगलीच रंगत भरली.

गोकुळ अष्टमीचे औचीत्य साधुन येथील गांधी चौकात घेण्यात आलेल्या या दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे संघटक मंत्री विदर्भ प्रांत उपेंद्र कोठेकर, वर्धा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, विदर्भ प्रांत बजरंग दलचे अनुप जयस्वाल यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषद सदस्य आमदार दादाराव केचे हे होते तर, माजी नगराध्यक्ष वसंतराव गुल्हाणे,  शिवसेनेचे दशरथ जाधव, माजी जिल्हा परिषद सभापती निता गजाम, कारंजा पंचायत समितीच्या माजी सदस्या रोषणी ढोबाळे, माजी सदस्य आम्रपाली बागडे, माजी नगराध्यक्षा दुर्गेश पुरोहीत, माजी पंचायत समिती सभापती हनुमंत चरडे, अनील जोशी, राजाभाऊ गिरधर, राजु हिवसे, विनय डोळे, माजी नगर सेवक प्रकाश गुल्हाणे, सुरेश मोटवाणी, विष्णु सवाई, सुरेश नागपुरे, माजी जिल्हा परिषद सभापती दादा गाडगे, माजी नगराध्यक्ष उर्मीला पवार, मनोज गोडबोले, रवी शिरभाते, अमोल पवार, नारायण लोडे, मनीष उभाळ आदि प्रमुख अतिथी होते.

यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना धार्मीक परंपरेची व संस्कृतीची जपवणुक करण्याकरीता सातत्याने आमदार दादाराव केचे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या दहीहंडी कार्यक्रमाची प्रसंशा केली आणी सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत अमरावती येथील रामकृष्ण मंडळ, ब्रदर्स ग्रुप अंबापेठ अमरावती, भोलेश्र्वर दहीहांडी ग्रुप नागपुर, जय महाकाली दहीहंडी ग्रुप नागपुर, जय श्रीराम दहीहांडी ग्रुप नागपुर, शिव तांडव दहीहांडी ग्रुप शिरसगाव, महाकाली दहीहांडी ग्रुप शिरसगाव, वॉरिअर्स दहीहांडी ग्रुप शिरसगाव, जय भोले दहीहांडी ग्रुप शिरसगाव, कालभैरव दहीहांडी गुप शिरसगाव, विर भगतसिंग दहीहांडी ग्रुप शिरसगाव, फ्रेंडस दहीहांडी ग्रुप धामणगाव, छत्रपती गोविंद पथक अमरावती, प्रभु श्रीराम दहीहांडी ग्रुप ब्राम्हणवाडा, फ्रेंडस ग्रुप धामणगाव याशिवाय मध्य प्रदेश येथील धारणी, बैतुल, छिंदवाडा, धारणी (बऱ्हाणपुर), आदि १९ पथकांनी सहभाग नोंदवीला होता.

प्रथम ३५ फुटावर बांधलेली दहीहंडी २७ फुटा पर्यंत खाली आणली होती, ती फोडण्याकरीता सहभागी  पथकांनी महत प्रयास केले. यातील धामणगाव येथील फ्रेंडस ग्रुप ने अवघ्या ५३. ८५ सेंकद मध्ये फोडून एक लाख ५१ हजार रुपयाचे प्रथम पारितोषीक पटकावीले तर, शिरजगाव (बंड) येथील शिव तांडव गोवींदा पथकाने आवध्या ५७.०८ सेकंदात फोडल्याने ते एकाहत्तर हजार एकशे एक रुपयाच्या दुसरे पारीतोषीकाचे मानकरी ठरले. तर, शिरजगाव (बंड) येथील महाकाळ गोवींदा पथकाने ५८.३६ सेकंदात दहीहंडी फोडली त्यांचे पारितोषीकाचे स्वप्न अवध्या एका सेकंदाने हुकले. मात्र त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. तर, इतर पथकांना सुध्दा २१ हजार, ११ हजार व सात हजाराचे पारितोषीक देवुन सन्मानीत करण्यात आले.

या स्पर्धेचा आनंद घेण्याकरीता परिसरातील हजारो नागरिक, महिला, तरुण, तरुणी सहभागी झाले होते. यावेळी करण्यात आलेल्या पाण्याच्या वर्षावाचा आनंद घेत वयोवृध्द, तरुण युवक, युवती व महिलांनी सुध्दा डिजेच्या तालावर नृत्य करीत एक वेगळेच दृष्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालय नंदु वैध्य, आवेज पठाण यांनी करुन आभार विनय डोळे यांनी मानले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता, मयुर पोकळे, प्रवीण पवार, अमीत शिंगाणे, विक्की पवार, चेतन तिरभाणे, दिनेश लायचा, विक्की राठोड, ऋृषी गुल्हाणे, गौरव कुऱ्हाडे, हर्षल शेंडे, प्रितम लोखंडे, संकेत विरुळकर, मनोज गुल्हाणे, विशाल राऊत, गजु कदम, नितीन येत्ते, सुनील लोखंडे, नुरकी महाजन, नवाज मलीक, विजय गिरी, प्रवीण वनखेडे, लवेश गलोले, सुनील धुळे, श्याम काळे, अमित अंभोरे, अमोल पांडे, रोषण राऊत, आजिम फारुकी, सोहेल शेख, निखील खोंडे, अशोक चिमोटे, सागर निर्मळ, हितेश रेंडके, मोहन पावडे, गोपाल तिवारी, नंदु शाहु आदिंनी परिश्रम घेतले.

स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न फसला

विधान परिषद सदस्य आमदार दादाराव केचे यांनी आयोजीत केलेली हि स्पर्धा यशस्वी होवु नये याकरीता राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावर काही काडी बहाद्दर समाज कंटकांच्या भुलथापीला बळी पडुन  येथील अधिकाऱ्यांनी न पटण्याजोगे कारण पुढे करुन वेळेवर आर्वी, आष्टी व कारंजा येथील अग्नी शमन दलाचे बंम्ब देण्यास नकार दिला आणी पैसे सुध्दा परत केले. मात्र आमदार दादाराव केचे व त्यांच्या सहकाऱ्यांनी न डगमगता पुलगाव, वर्धा आणी सेलु येथुन अग्नी शमन दलाला बोलावुन यावर मात केली. यामुळे पक्षांतर्गत असलेल्या राजकीय नेत्यांचा स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न फसला. परिणामी नागरिकांमध्ये उलट सुटल चर्चा सुरु झाली असुन एकाच पक्षात असतांना एकदुसऱ्याला खाली दाखवीण्याची भावना योग्य नसुन या पुर्वी अस कधीच झाल नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button