लक्ष्मण बोरवार, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणुन पदोन्नती

आर्वी,दि.१६:- पाचोड येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण बोरवार यांना पदोन्नती मिळाली असुन त्यांची वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उपक्रमशील शिक्षक म्हणुन त्यांची गणना होती. नवनवीन प्रयोग करुन विध्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्यात त्यांचा हातखंडा होता. विध्यार्थ्यांमध्ये उत्सुक्ता निर्माण करणारे तसेच अभ्यासात गोडी निर्माण करणारे आनंदायी शिक्षण देण्यासाठी सातत्याने त्यांचा पुढाकार राहत असे. त्यांच्यातील या गुणामुळेच त्यांना पदोन्नती मिळवीता आली असुन त्यांची पंचायत समीती आष्टी येथे नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल केन्द्र प्रमुख विलास तराळे, अविनाश टाके, मंगेश कोल्हे, दिलिप गावनेर, शरद हिवाळे, रवी गोहत्रे, अजय काकडे, सुरेश ताजने, दिलिप बुटे, शारगंधर पासरे, हरीष वडाळकर, रवींद्र ठाकरे, दिलिप जयस्वाल, गोपाल दांडेकर, जयंत हिरुडकर, नरेंद्र घोडखांदे, नरेंद्र बबुलकर,आशाताई चौधरी, सुरेश शेळके, सुरज लोखंडे, प्रशांत ढवळे, श्रीधर बोराडे, रामदास काळे, रमेश कैलुके, विवेक कहारे, प्रफुल्ल कांबळे, सुचका ढोले, अर्चना कराळे, मनिष शेन्डे, रविकांत बुरघाटे, नरेंद्र पखाले, योगेश पाटील, केन्द्र प्रमुख संजय कोहचाडे, नाथजोगी, राजेश सोमकुवर, बाळासाहेब गुजरकर, उमेश आसटकर, मनोज सवाई, अशोक धुर्वे, आदिं शिक्षकांनी अभिनंदन केले आहेत.