Maharashtraशेती विषयक

शेत पिकांवर विविध प्रकारच्या किड्यांचा मारा, पिक होत आहे नेस्तनाबुत अधिकारी उपाय सांगुन होत आहे मोकळे, मात्र शेतकरी येत आहे अडचणीत

शासनाने मदतीचा हात पुढे करावा**** खासदार, आमदार प्रश्न सोडवतील काय?

          आर्वी,दि.८:- खरीप हंगामातील नगदी पिकांवर खोडमाशी, चक्रीभुंगा, हुमणी, मर रोग आदिंचा जबरदस्त मारा होत असल्याने एैन तारुण्यात असलेले सोयाबीन, कापुस पिक नेस्तनाबुत होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी शेतकरी आर्थीक अडचणीत येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, दुसरीकडे कृषी अधिकारी पाहणी करुन व उपाय सांगुन मोकळे होत असल्याने शेतकऱ्यांमध्य संतापाची भावना निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांकरीता खरीप हंगाम हा सर्वात महत्वाचा आहे. या हंगामातील निघालेल्या उत्पादीत मालावरच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. हंगामाची सुरूवात चांगली झाली. पिक सुध्दा चांगले बहरले. मात्र पिक एैन तारुण्यात येताच त्यांच्यावर खोडमाशी, चंक्रीभुंगा, हुमणी, मररोग आदिंचा मारा सुरु झाला. पिक जागेवरच नेस्तनाबुत होवु लागले. सध्यातरी साठ ते सत्तर टक्के पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. उर्वरीत ४० टक्के पिक वाचवीने शेतकऱ्यांच्या हातात आहे. कृषी अधिकारी दौरा काढून पाहणी करतात आणी कोणकोणत्या रोगांवर कोणकोणती औषधी फवारावी यांची माहिती देवुन मोकळे होतात.  त्यांनी सुचवील्या प्रमाणे उपाय योजना सुध्दा केल्या जात आहे. मात्र याचा सुध्दा परिणाम शुन्यच दिसुन येत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थीक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाने मदतीचा हात पुढे करावा

          कृषी विभागाच्या माध्यमातुन वेळेवेळी केल्या जाणाऱ्या मार्गदर्शना प्रमाणेच शेतकरी पिकांची व्यावस्था करतो. मात्र ऐवढ होवुन सुध्दा निसर्ग त्यावर मात करतोच. पावसाने साथ दिली तर, किडे व रोग त्याचा पिच्छा सोडत नाही. यंदा तर कहरच झाला. एैन तारुण्यात पिकांवर विविध प्रकारच्या किड्यांचा मारा झाला अर्धेअधिक पिक नेस्तनाबुत झाले तर उर्वरीत पिकांचा सुध्दा भरोसा राहीला नाही. अशात शासनाने मदतीचा हात पुढे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच उर्वरीत पिक वाचवीण्याकरीता शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करुन उपाययोजना करावी व शेतकऱ्यांना आर्थीक अडचणीतुन सोडवावे अशी मागणी वर्षा हरिष वडाने, दिनेश इंगोले, राजेंद्र इंगोले, धिरज कदम, राहूल बोरघडे, मंगेश क्षीरसागर, लोकेश वाडाने, हेमंत भाकरे आदि शेतकऱ्यांची आहे.

खासदार, आमदार प्रश्न सोडवतील काय?

          तिन तालुके मिळुन निर्माण झालेला आर्वी विधान सभा क्षेत्र, या विधानसभा क्षेत्रात कोणतेच उध्योग नसल्याने ८० टक्के लोक शेतीवर अवलंबुन आहेत तर बाकीचे हातमजुरी करुन व व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवीतात. अशातही बाहेरचे कंत्राटदार आल्यामुळे रोज मजुरदारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जिव्हाळ्याचे संबंध असलेले आमदार विधानसभेला लाभले आहे तर विरोधी पक्षातील खासदार आहेत. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांची मागणी शासनाकडे मांडल्या जाईल काय? सत्ताधारी पक्षातील दोन्ही आमदार आणी विरोधी पक्षाचे खासदार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील काय? असा प्रश्न निर्माण केल्या जात असुन याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button