स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्षा नंतर पांजरा (बं.) गावात प्रथमच आली महामंडळाची बस गावकरी व विध्यार्थ्यांनी केला आनंद साजरा

आर्वी,दि.५:- वनक्षेत्राच्या नरसींगपुर फिलींग सिरीज परिसरातील मध्य वनात वसलेल्या पांजरा (बं.) या गावात स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्षा नंतर पहिल्यांदाच एस. टी महामंडळाची बस आल्याने गावकरी व विध्यार्थ्यांनी आनंद साजरा करुन महामंडळाचे आभार मानले.
स्वातंत्र्यपुर्व काळात दाट वनपरिसरात वसलेल पांजरा (बं.) हे गाव. पारतंत्र्यात इंग्रज अधिकाऱ्यांनी या गावा लगत असलेल्या सर्वात उंच टेकडीवर बंगला बांधला आणी याच माध्यमातुन पांजरा (बंगला) हे नाव पडले. बंजारा समाजाच हे गाव असलं तरी येथे मोठमोठे इंग्रज अधिकारी शिकारी करीता येत होते. त्या काळात वन्य प्राण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणुन त्यांनी त्यावेळी पंचधारा नदीवर छोटेखाणी धरण सुध्दा बांधले आहे. हे धरण आजही मजबुत स्थितीत असुन चांगल्या बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या धरणावर पाणी पिण्याकरीता येणाऱ्या जणावरांना ते शिकार करायचे. अस असल तरी स्वातंत्र्यानंतर सुध्दा हे गाव सुवीधेपासुन वंचीत राहिले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळुन तब्बल ७८ वर्ष झाले मात्र या ७८ वर्षात या गावातील नागरिकांना दाट जंगलातुन दोन किलोमिटर पायपीट करत जावे लागत असे. आता कुठे या गावाला एस.टी.महामंडाळाच्या बसची चाके लागलीत यामुळे गावातील नागरिकांमध्ये उत्साचे वातावरण तर निर्माण झालेच शिवाय विध्यार्थी सुध्दा आनंदी झाले आहे.