दहेगाव (मुस्तफा) येथील निकृष्ट दर्जाचे बांधकाम नागरिकांच्या जिवावर बेतनार प्रवासी बस फसली खड्यात, प्रवाशांचे जिव पडले भांड्यात, कारवाईची मागणी

आर्वी,दि.२:- लगतच्या दहेगाव (मुस्तफा) येथे पाणी पुरवठा विभागांतर्गत होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे नागरिकांच्या जिवावर बेतण्याची दाट शक्यता असल्याने कंत्राटदारावर कारवाई करुन करारनाम्या नुसार चांगले काम करुन घ्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
जिल्हा परिषद सेस फंडामधुन दहेगाव (मुस्तफा) येथे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम फारच निकृष्ठ दर्जाचे होत आहे. पाईप लाईन टाकण्याकरीता खोदलेले खड्डे बुजवीतांना कंत्राटदाराने पैसे वाचवीण्याकरीता दिरंगाई केली असल्याने एखादेवेळी नागरीकांच्या जिववावर बेतल्या शिवाय राहणार नाही. मुख्य रस्त्याने खोदलेल्या या नाली वरुन प्रवासी बस गेली असता चाकामुळे नाली मध्ये मोठा खड्डा निर्माणा झाला. बस अडकुन एका बाजुला झुकली मात्र पलटी होता होता थांबली परिणामी प्रवाश्यांचे जिव वाचले अन्यथा मोठी अप्रीय घटना घडली असती . एवढच नव्हे तर अशा अनेक घटना घडल्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने यावर लक्ष केंद्रीत करुन कंत्राटदारावर कारवाई करावी व मजबुत काम करुन घ्यावे अशी दहेगाव (मुस्तफा) येथील नागरिकांची मागणी आहे.