Maharashtraपोलीस कारवाई

स्थानीक गुन्हे प्रगटीकरण पथकाची जबरदस्त कारवाई ****बेडरुम मधील पलंगात तर, महिलेने किचन रुम मधील सुरूंगात दडवीली होती दारु ***

एक लाख १७ हजाराची देशी, विदेशी व गावठी मोहा दारु जप्त, दोघांना अटक

आर्वी,दि.३१:- अवैध्य व्यवसायीक वेगवेगळ्या कृलुपत्या करुन पोलीसांना चकमा देण्याचा प्रयत्न करीत असले तरी सतर्क असलेल्या पोलीसांच्या नजरेतुन ते सुटत नाही. बेडरुम मधील पलंगात लपवीलेला व स्वयंपाक घरात सुरुंग करुन लपवीलेल्या साठ्याचा शोध घेवुन येथील स्थानीक गुन्हे प्रगटीकरण पथकाने एक लाख १७ हजार २५० रुपयाचा देशी, विदेशी व गावठी मोहा दारुचा साठा जप्त करुन दोघांना अटक केली. मंगळवारी (ता.२९) हि कारवाई करण्यात आली. यामुळे दारु व्यवसायीकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

दिलीप कुसरु ठाकरे राहणार जनता नगर व दर्शनाकौर बावरी राहणार विठृठल वार्ड अशी आरोपींची नावे आहेत. शहराच्या जनता नगर व विठ्ठलवार्डात मोठ्या प्रमाणात दारुचा साठा राहत असुन अवैध्य रित्या विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाला मिळाली. त्यांनी अनेक वेळा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न असफल झाले. मात्र दारु विक्री काही थांबली नाही. मंगळवारी (ता.२९) ठाणेदार सतिश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे प्रगटीकरण पथकाने गुप्त रित्या योजना आखली आणी जनता नगर मधील दिलीप ठाकरे यांच्या घराची झडती घेतली यावेळी बेड रुम मधील पलंगावर त्यांची नजर पडली आणी त्यात शोध घेतला असता आत मध्ये दडवुन ठेवलेला दारु साठा सापडला.

त्याच दिवशी विठ्ठल वार्डातील सिकलकर मोहल्यात बावरी यांच्या घराची सुध्दा झडती घेतली. सगळ घर छानुन काढल मात्र दारु साठा कुठेच दिसत नव्हता. मात्र या दरम्यान चालतांना स्वयंपाक घरातील स्टाईल मधुन वेगळाच आवाज आल्याने ती स्टाईल उखडुन पाहिली तर आत मध्ये टाका बनवुन त्यात दारु साठा लपवुन ठेवल्याचे दिसुन आले.

दोन्ही प्रकरणात पोलीसांनी रॉयल स्टँग कपंनीच्या पाच निपा, आयकॉनिक व्हॉईट कंपनीच्या २०२ निपा, देशी संत्रा बॉबी कंपनीच्या १६२ निपा, दोन पन्नीमध्ये भरुन ठेवलेली २५० लिटर गावठी मोहा दारु असा एकुन एक लाख १७ हजार २५० रुपयाचा दारु साठा जप्त करुन आरोपींवर विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद घेतली व अटक केली.

हि कारवाई पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक भटकर, ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस अमंलदार योगेश चन्ने, अमर हजारे, अंकुश निचत, अमोल गोरटे, सुरज रिठे, बालाजी मस्के आदिंनी केली असुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button