Maharashtraसार्वजनीक माहिती

न्यायालयाच्या निर्देशाचे पालन*** रस्त्याचे काम होणार शुक्रवार पासुन सुरु *** आमदार सुमीत वानखेडे यांना बदनाम करण्याचे शडयंत्र असल्याची चर्चा***

काय आहे उच्च न्यायालयाचे निर्देश ?*** विध्यार्थी, नागरीकांच्या जिवीत हानीची जबाबदारी कोण घेणार?*** शहराचे होणाऱ्या विद्रुपीकरणाची जबाबदारी कोण घेणार?***आमदार सुमीत वानखेडे यांना बदनाम करण्याचे शडयंत्र असल्याची चर्चा****संवैधानीक पध्दतीने मागणी करणार, काम अडवीणार नाही.***

          आर्वी,दि.३०:- रखडत अडखळत सुरू असलेल्या तळेगाव (शा.पं.) या महामार्गाचे काम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत शुक्रवार (ता.एक) पासुन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीसात दिली आहे. मात्र दुसरीकडे आमदार सुमीत वानखेडे  बदनाम करण्याच कटकारस्थान सुध्दा भाजप सोबत सलगी साधुन असलेल्या समाज कंटकांनी सुरू केला असल्याची जोरदार चर्चा सुध्दा आहे.

सन २०१७ पासुन या ना त्या कारणाने आर्वी- तळेगाव (शा.पं.) या १४ किलोमिटर महामार्गाचे बांधकाम रखडत अडखळत सुरू आहे. शेवटी दिड किलो मिटरचे बांधकाम थांबले आहे. झाडांचा अडथळा पुढे करत राष्ट्रीय महामार्ग सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जिवीताचा कोणताच विचार न करता हा भाग कमी रुंदीचा बनवीण्याचा घाट घातला होता. अर्ध्या मिटरचा व्दिभाजक व सात मिटर ऐवजी अवघ्या पाच मिटरच्या रस्त्याचे सिमेंटीकरण ते करणार होते व आहेत. याला नागरिकांचा विरोध असल्याने आमदार दादाराव केचे यांनी याविरुध्द आवाज उठवुन शासनाने ठरवील्या प्रमाणे दिड मिटरचा व्दिभाजक, सात मिटरचा रस्ता, दोन मिटरचे प्लेवींग ब्लाक आणी नाली या प्रमाणे बांधकाम करण्यात यावे अशी भुमीका घेतली होती. त्याला नागरिकांचा सुध्दा पाठींबा आहे.  राष्ट्रीय सार्वजनीक बांधकाम विभागाने याचा विचार न करता चक्क बांधकामच बंद करुन नागरिकांना अडचणीत आणण्याचे काम सुरू केले आहे.

काय आहे उच्च न्यायालयाचे निर्देश ?

           अमरावती येथील उड्डान पुलाचे बांधकाम सुध्दा सन २०१७ च्या पुर्वी पासुन म्हणजेच सुमारे आठ वर्षा पासुन पुर्ण झाले नाही यामुळे तेथील नागरिकांनी उड्डान पुलाचे बांधकाम त्वरीत सुरू करुन पुर्ण करण्यात यावे याकरीता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचीका दाखल केली होती. काही दिवसा पुर्वी या याचीकेची सुनवाई करतांना न्यायाधिशांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग नागपुरच्या अधीकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. अनेक वर्षा पासुनअडखळलेल्या महामार्गांचे बांधकाम निर्धारीत वेळेच्या आत पुर्ण करण्यात यावे असे निर्देश दिले असल्याचे कळते. याच निर्देशाचा हवाला देत  राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने नागरिकांच्या जिवताचा कोणताच विचार न करता आर्वी- तळेगाव (शा.पं.) या महामार्गाची रुंदी कमी करुन रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय केला आहे.

विध्यार्थी, नागरीकांच्या जिवीत हानीची जबाबदारी कोण घेणार?

          आर्वी- तळेगाव (शा.पं.) महामार्ग हा शहराच्या मध्यभागातुन जात आहे. या मार्गावरुन बाहेर राज्यातुन येणारी मोठमोठी वाहने भरधाव वेगाने धावणार आहेत तर, दुसरीकडे सर्व्हिस मार्ग सुध्दा नाही आणी होणार सुध्दा नसल्याने शहरातील लोकांना याच मार्गाचा उपयोग दररोजच्या कामा करीता करावा लागणार आहे. या महामार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन होणार आहे. एका भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे तर दुसऱ्या भागात शाळा, महाविध्यालय, बँका, बस स्थानक, रुग्णालये आहेत. अवागमनाकरीता दुसरा कोणताच मार्ग नाही. एका बाजुचा मार्ग ओलांडल्यानंतर मधात सुरक्षीत थांबण्याकरीता बांधकाम तज्ञांनी दिड मिटरचा व्दिभाजक निर्माण करण्याचे ठरवीले आहे. मात्र नागरिकांच्या जिवीताची पर्वा न करता झाडांचा बहाना पुढे करुन बांधकाम विभागाने हा मंजुर असलेला दिड मिटरचा व्दिभाजक एका फुटा पर्यंत कमी करुन बांधकाम करण्याचा घाट घातला आहे. परिणामी रस्त्याच्या मधात उभ राहण्याकरीता सुरक्षीत जागा राहत नसल्याने जास्तीत जास्त अपघात होण्याची शक्यता आहे यात जिवीत हानी सुध्दा होण्याची शक्यता असल्याने याची जबाबदारी कोण उचलणार? असा प्रश्न आहे.

शहराचे होणाऱ्या विद्रुपीकरणाची जबाबदारी कोण घेणार?

          शहराच्या माध्यभागातुन हा महामार्ग जात असल्याने हा मार्ग योग्य पध्दतीने झाल्यास शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. मात्र याच महामार्गचे विद्रुपीकरण करण्याचे काम सुरू आहे. पुलगाव मार्गावरील रेल्वे क्रॉसींग पासुन तर गावातील मध्यभागी असलेल्या डाक कार्यालयापर्यंतचे बांधकाम पुर्ण रुदिंचे झाले आहे. दिड मिटरचा व्दिभाजक सुध्दा करण्यात आला आहे. त्यात विजेरीचे खांब सुध्दा उभे करण्यात आले आहे. मात्र याच मार्गाला पुढे वाढवीतांना रस्त्याचे रुंदीकरण तब्बल दोन मिटरने कमी करुन बांधकाम करण्यात येणार आहे. म्हणजेच अर्धा रस्ता हा २१.५ मिटरचा होणार आहे तर, अर्धा रस्ता १९ मिटरचा होणार असल्याचे बोलल्या जात आहे. यातही व्दिभाजक दिडच फुटाचा होणार आहे. शिवाय रस्ता सुध्दा मध्यभागापासुन दोन फुट डाव्या बाजुला म्हणजे नगर परिषद कार्यालयाकडे सरकवीण्यात आला आहे. यामुळे रस्त्याच्याच नव्हे तर शहराचे विद्रुपीकरण सुध्दा होणार असल्याने याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आहे.

आमदार सुमीत वानखेडे यांना बदनाम करण्याचे शडयंत्र असल्याची चर्चा

          आमदार सुमीत वानखेडे हे सातत्याने सुंदर शहरच नव्हे तर, विधानसभा क्षेत्राला सुजलाम, सुफलाम, रोजगारभिमुख करण्याकरीता झटत आहे. मात्र त्यांना बदनाम करण्याच शडयंत्र भाजपासोबत सलगी साधुन असलेल्या समाजविघात प्रवृत्तीच्या मध्यमातुन होत असल्याचा संशय निर्माण होत आहे. आर्वी-तळेगाव (शा.पं.) रस्त्याचे उर्वरीत काम न्यायालयाच्या निर्देशाचा हवाला देवुन राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्यावतीने शुक्रवार (ता.एक) पासुन करण्यात येणार आहे. मात्र हे काम आमदार सुमीत वानखेडे यांच्या प्रयत्नाने होत असल्याचा संदेश समाज माध्यमातुन पसरवील्या जात आहे. ‍कमी रुंदीच्या व्दिभाजकामुळे रस्ता ओलांडतांना भविष्यात अपघात झाले तर, आधीच वयोमाना नुसार निर्जीव झालेली झाडे रस्त्याच्या मधात उभी आहेत. ती पडून अपघात घडला, जिवीतहानी झाली तर. याला जबाबदार धरुन याच खापर आमदार सुमीत वानखेडे यांच्या माथ्यावर फुटण्याची शक्यता नाकराता येत नसल्याने, भाजप सोबत सलगी साधुन असलेल्या समाजविघात व्यक्तीचे हे शंडयंत्र तर नाही ना? अशी ही शहरात जोरदार चर्चा आहे.

संवैधानीक पध्दतीने मागणी करणार, काम अडवीणार नाही.

जन आक्रोश समितीच्या समन्वयक समिती सदस्यांची येथील विश्राम गृहात बैठक झाली. या बैठकीत सखोल चर्चा झाली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्याचे काम सुरु होत असल्यामुळे तसेच सणा सुदीचे दिवस असुन नागरिकांची सुध्दा गैरसोय होत आहे. याचा विचार करुन रस्त्याचे होत असलेले काम अडवीण्यात येवु नये असे ठरवीण्यात आले. याशिवाय न्यायालयात झाडे तोडण्याबाबात सुरू असलेलया खटल्याच्या माध्यमातुन संवैधानीक पध्दतीने नागरिकांच्या जिवीताचा व शहराच्या सौंदर्यीकरणाचा  विचार करुन दिड मिटर रुंदीच्या व्दिभाजकाची व ठरल्या प्रमाणे रस्त्याचे काम करण्याची मागणी आम्ही लावुन धरलेली आहे. ति कायमच राहणार असुन यात कोणताही बदल होणार नाही अशी माहिती समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button