अनेक घडलेत, तुम्ही सुध्दा संधी घ्या राजकीय शिक्षणाची सुवर्ण संधी, शिष्यवृत्ती सुध्दा मिळणार

आर्वी,दि. २८:- पुण्याच्या एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट महाविध्यालयामधून निघालेल्या अनेकांनी आपले राजकीय भविष्य घडवीले असुन आपणाला सुध्दा या महाविध्यालयात प्रवेश घेवुन हि संधी साधता येणार आहे. या करीता लागणाऱ्या फि च्या ३३ टक्के शिष्यवृत्तीचा हात सुध्दा मिळणार असल्याने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
एम आय टी स्कुल ऑफ गव्हर्नमेट हे महाराष्ट्रातील एक अग्रगन्य महाविध्यालय आहे. या महाविध्यालया मधुन प्रशिक्षण घेतलेल्या विध्यार्थ्यांनी राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उंची गाठली आहे. याशिवाय मोठ्या पगाराच्या नौकरीची सुध्दा संधी मिळते.
आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमीत वानखेडे यांनी सन २०११-१२ मध्ये डॉ. राहुल कराड यांनी स्थापन केलेल्या याच महाविध्यालयामधुन राजकीय शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर यशस्वी राजकारणी तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणुन त्यांनी जबाबदारी सांभाळली आणी मागे आलेच नाही. आज आर्वी विधान सभा क्षेत्रा आमदार तर झालेच शिवाय वर्धा जिल्ह्याचे नेते म्हणुन त्यांची ओळख निर्माण होत आहे. याशिवाय अनेकांनी आपले राजकीय भवीतव्य घडवीले आहे, नौकरीच्या माध्यमातुन जनतेची सेवा करण्याचे कार्य यशस्वी पणे पार पाडले आहे.
या महाविध्यालयातुन शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील गरजु विध्यार्थ्यांकरीता महाविध्यालयाने शिष्यवृत्तीच्या माध्यमातुन फि च्या ३३ टक्के सुट देण्याची घोषणा केली आहे. दोन वर्षाचा हा कोर्स असुन ५० टक्के गुणासह पदवी पुर्ण करणाऱ्या विध्यार्थ्यांना यात प्रवेश घेता येणार आहे. पहिल्या वर्षात क्लासरुम टीचिंग व स्टडी टुर तर, दुसऱ्या वर्षात राजकीय व सामाजीक इंटर्नशिप करावी लागणार आहे. आपले भवितव्य घडवीण्याकरीता याचा लाभ घ्यावयास इच्छुक असलेल्या विध्यार्थ्यांनी ९७६६४८२६४२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.