Maharashtraदुर्घटना

महाविध्यालयीन तरुणीने केला विष प्राशन**** उपचारा करीता नेता नेता झाला मृत्यु ****आर्वीच्या बस स्थानकावरची घटना**** प्रेम प्रकरणाचा संशय ****

प्रेम प्रकरणातुन आत्महत्या ?*****अपुऱ्या सुविधेने घेतला मुलीचा बळी****

आर्वी,दि.२५:- येथील एका कनिष्ठ महाविध्यालयाच्या विध्यार्थीनीने चक्क बस स्थानकावर आत्महत्या करण्याच्या दृष्टीने  विषारी औषध प्राश्न केलं तिला उपचाराकरीता नेत असतांना वाटेतच तिचा मृत्यु झाला. या मागचे कारण शोधण्याकरीता पोलीसांनी सिसिटीव्ही खंगाळने सुरू केले असुन प्रेम प्रकरणातुन हा प्रकार घडला असावा असा हि संशय व्यक्त केल्या जात आहे.

देऊरवाडा येथील हि मुलगी असुन येथील कनिष्ठ महाविध्यालयात बारावी “एमसीव्हिसी” मध्ये शिकत आहे. बुधवारी (ता.२३) दुपारी कॉलेज आटोपून ती बस स्थानकावर आली. यावेळी कुणालाही माहित न होता तिने तणनाशक हे विषारी औषध प्राशन केले. हि बाब सोबतच्या दोन मुलींना लक्षात आल्यामुळे त्यांनी प्राथमीक उपचाराकरीता येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र येथे पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे तिला अमरावतीला हलविण्याच्या निर्णय घेतला मात्र जाता जाताच तिचा रस्त्यात मृत्यु झाला.

या प्रकरणी पोलीसांनी मर्ग दाखल केला असुन ठाणेदार सतिश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात राज पंडित यांनी सखोल तपास सुरू केला आहे.

प्रेम प्रकरणातुन आत्महत्या ?

            मृतक मुलीचे कर्माबाद येथील एका मुला सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. त्यांच्यात काही कारणावरुन वाद निर्माण झाला आणी मुलीने अंतीम निर्णय घेवुन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असावा अशी परिसरात जोरदार चर्चा आहे.

अपुऱ्या सुविधेने घेतला मुलीचा बळी

            म्हणायला आर्वीला उपजिल्हा रुग्णालय आहे. येथे सर्व प्रकारची आरोग्य विषयक यंत्रे आहेत मात्र त्यांचे तज्ञ तंत्रज्ञ नाही. त्या धुळ खात पडल्या असुन उपचाराची पुरेशी सोय उपलब्ध नाही. डॉक्टर व कंर्मचाऱ्यांमध्ये भांडण सुरू आहे. एक दुसऱ्याला अडचणीत आणण्याकरीता शडयंत्र रचल्या जाते. अशात उपचारा करीता येणाऱ्या रुग्णांवर दुर्लक्ष होत आहे. डॉक्टर  जबाबदारी उचलायला तयार नाहीत. रुग्ण आला की त्याला तपासतात आणी बाहेर गावी पाठवीता हे नित्तनेमाचे झाले आहे. विषारी औषध प्राशन करुन आलेल्या मुलीला योग्य प्रकारे प्राथमीक उपचार मिळाले असते तर तीचा बळी गेला नसता असे बोलल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button