Maharashtraआंदोलन

जयदादा बेलखेडे यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेच कारंजा येथे आंदोलन

शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा,**** अमरावती नागपुर हायवे धरला अडवुन ****आंदोलन कर्त्यांना झाली अटक***

          कारंजा,दि.२४:- शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करु असे आश्वासन देवुन खोटे पणाने निवडून आलेल्या महायुती गठबंधनने आपले आश्वासन पुर्ण करावे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा या मागणी करीता प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चु कडू यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत जयदादा बेलखेडे यांच्या नेतृत्वात गुरूवारी (ता.२४) तहसिलदार यांना निवेदन देवुन सर्व पक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास रस्ता अडवून धरला तदनंतर पोलीसांनी आंदोलन कर्त्यांना अटक केली.

   महाराष्ट्रातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आदि पक्षाच्या महायुती गठबंधन ने निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने सत्तेवर येताच पहिल्या सत्रात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करु असे आश्वासन दिले होते. मात्र सत्ता हाती येताच आश्वासन विसरले. सरकार स्थापन होवुन तब्बल सात महिने झाले मात्र अध्यापही कर्जमाफी मधला “क” हा शब्द सुध्दा ते उच्चारत नाही. यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील दोन हजार ७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. म्हणजे दर दिवसाला कर्जबाजारी पणाला कंटाळुन आठ शेतकरी मृत्युला कवटाळत आहे.

     तर, दुसरीकडे यांचे मंत्रीगण, आमदार रम, रमा, रमीत गुंग झालेले आहे. विधान भवनात प्रश्नांचे तास सुरू असतांना कृषी मंत्री रमी खेळण्यात गुंग असल्याचे यांचे फोटो व्हायरल होत आहे. मारझोड करणाऱ्या लज्जास्पद घटना घडत आहे. उघड्यानागड्या मंत्र्याचे व्हिडीओ पैशाच्या भरलेल्या बॅगानसह व्हायरल होत आहे. तर कुणी तंबाकु खाऊन पिचकाऱ्या सोडत असल्याची दृष्ये जन सामान्या पुढे येत आहे. यामुळे अख्या महाराष्ट्रातील जनतेला लज्जेने मान खाली घालावी लागत असल्याचा उल्लेख या निवेदनात असुन विधवा  महिला योजना, रोजगार हमी योजना, शेतमजूर, दिव्यांगांना किमान 6 हजार रुपये मानधन मिळावे आदि  प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहे.

नारा टि पाईटवर झालेल्या या चक्का जाम आंदोलनात प्रहार संघटना बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, व्दिव्यांग प्रहार संघटना, स्वराज्य शेतकरी संघटना, मनसे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, नागरी समस्या संघर्ष समिती, शेतकरी संघर्ष समिती तथा विविध सामाजीक संघटनेचे पदाधिकारी व परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button