निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा उत्कृष्ट नमुना**** तिर्थक्षेत्राला सुध्दा सोडल नाही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी
चार महिण्या पासुन सुरू असलेल्या टाकरखेडा रोडवर फसला ट्रक

आर्वी,दि.१२ :- श्री संत लहानुजी महाराज यांच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या टाकरखेडा या तिर्थ क्षेत्राला सुध्दा सार्वजनीक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सोडल नसुन गत चार महिण्यापासुन सुरू असलेल्या रोडची पोल एकाच पावसात उघड झाली आहे. या मार्गाने जात असलेला मालवाहु वाहन चक्क डिफ्रेंसीयल पर्यत फसल्याने वाहतूक ठप्प झाली. शुक्रवारी (ता.१२) हि घटना घडली असून निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा उत्कष्ट नमुना असल्याच बोलल्या जात आहे.
सार्वजनीक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन तिर्थक्षेत्र टाकरखेड ला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम गत चार महिण्यापासुन सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत बसवुन आमदाराच्या मर्जीतील कंत्राटदाराला या कामाचा ठेका देण्यात आला असल्याने तो आपल्या मस्तीने कासवगतीने रस्त्याचे काम करीत आहे. रस्ताचे काम फारच निकृष्ट दर्जाचे होत आहे. या मार्गावरील पुल तयार करण्याकरीता खोदलेल्या खड्यात पाईप टाकण्यात आले. त्याची भराई पक्का मुरूम व गोटे गिट्टीने करायला पाहिजे होती. मात्र कंत्राटदाराने काळी माती व कच्च्या मुरूमाचा उपयोग केला. शिवाय त्याची दबाई सुध्दा केली नाही. या पुलावरुन मालवाहु ट्रक जायला निघाला असता मुरूम दबला आणी मोठा खड्डा निर्माण होवुन त्यात ट्रकचे मागचे चाक फसले. परिणामी वाहतुक तर ठप्प झाली शिवाय ट्रकचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मरस्काल्हे यांनी दिली माहिती
शेतात काम करीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे विधानसभा अध्यक्ष गोपाल मरस्कोल्हे यांच्या लक्षात हे येताच त्यांनी आमदार सुमीत वानखेडे यांना भ्रमणध्वनीवरुन याची माहिती दिली. बांधकाम विभागाची यंत्रणा लगेच हलली. गीट्टी मुरूम टाकुन खड्डा बुजविल्या गेला. मात्र निकृष्ट बांधकामाचे काय? प्रश्न अनुत्तरीतच राहिला. काम करणाऱ्या कंत्राटदारावर व बांधकाम विभागाच्या अधिका-यावर कारवाई होणार काय? याकडे त्या मार्गाने जाणाऱ्या भावीक भक्ताचे लक्ष लागले आहे.