Maharashtraसामाजीक

*****रस्त्या लगतच्या व्यवसायीक अतिक्रमणा विरुध्द जबरदस्त जनआक्रोष **** राजकीय त्रिदेवासह, नेते, संघटना व आंदोलनकर्ते लक्ष घालणार काय?****

प्रशासनाच्या कारवाईला मतदारांची पोठली बांधणाऱ्यांचा अडथळा,@@@ आपला इगो सोडुन एकत्र येतील काय ? कळीचा प्रश्न, @@@नागरिकांच्या समाजमाध्यमांवरील भावना.@@@

          आर्वी,दि.२१ :- शहरात रस्त्यालगतच नव्हे तर, बाजारात सुध्दा व्यवसायीकांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले असुन यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी या विरुध्द जबरदस्त जनआक्रोष निर्माण झाला असुन मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयाच्या माध्यमातुन भावना व्यक्त केल्या जात आहे. याकडे खासदार, दोन आमदार या राजकीय त्रिदेवासह, नेते, संघटना व आंदोलनकर्ते लक्ष घालणार काय? असा प्रश्न नागरिकांचा  आहे.

मॉडेल हायस्कुल पासुन तर शिलाराम मंगल कार्यालयापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन तर, गांधी चौका पर्यंत दुसरीकडे बालाजी टॉकीज पर्यंत याशिवाय नेहरु मार्केट, इंदिरा मार्केट एवढच नव्हे तर संपुर्ण शहरात व्यवसायीकांनी अतिक्रमण करुन आपले छोटे मोटे व्यवसाय थाटले आहे. यात चार चाकी बंडीवाले व ग्राहक सुध्दा आपली वाहने रस्त्यावर ठेवुन त्यात भर घालतात. परिणामी वाहतुकीला अडथळा तर निर्माण होतोच शिवाय छोटे मोठे अपघात घडुन भांडणे सुध्दा होतात. यामुळे शाळकरी मुले, महिला, नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. खासदार व दोन्ही आमदारांसह गाव नेते, सामाजीक संघटना व आंदोलन कर्त्यांनी सुध्दा अतिक्रमण काढण्याकरीता प्रशासनाला बाध्य केल्या पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

प्रशासनाच्या कारवाईला मतदारांची पोठली बांधणाऱ्यांचा अडथळा

          जेव्हा जेव्हा प्रशासन व्यवसायीक अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा मतदारांची पोठली बांधणाऱ्यांचा अडथळा निर्माण होतो व दुसरेच दिवशी परिस्थीती जैसे थे होते. नगराध्यक्ष पदावर असतांना स्व. ॲड. प्रकाश भुसारी यांनी अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर चपला जोड्यांचा वर्षाव झाला कुणीही त्यांना सहकार्य केले नाही. स्व. पत्रकार साबीर अहमद व माजी नगरसेवक दशरथ जाधव यांनी त्यांचा बचाव करुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात नेवुन बसवीले अन्यथा वेगळच काही घडल असतं.  उपविभागीय अधिकारी असो, मुख्याधिकारी असो आदिंनी सुध्दा यापुर्वी अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करुन त्यांना चुप बसवीले ऐवढेच नव्हेत तर, अनेक संघटनांनी  सुध्दा विविध प्रकारचे आंदोलन करुन प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याचा वाईट अनुभव गावकऱ्यांच्या पाठीशी आहे.

आपला इगो सोडुन एकत्र येतील काय ? कळीचा प्रश्न

          शहरातील नागरिकांच्या हिताकरीता सर्व हेवेदावे सोडुन राजकीय नफा नुकसान सोडून, तो माझा हा तुझा ही प्रवृती सोडुन, खासदार, आमदार, गावनेते, विविध संघटनेचे पदाधिकारी इमाने इतबारे एकत्र आले. त्यांनी अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाच्या सोयीचा विचार केला. तर नक्कीच अतिक्रमण काढण्याकरीता कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. शिवाय कोणीही अतिक्रमण करणार नाही याची दक्षता घेण्यास प्रशासन सुध्दा मागे पुढे पाहणार नाही.  मात्र आपला इगो सोडून हे एकत्र येतील काय? हा खरा कळीचा प्रशन आहे.

नागरिकांच्या समाजमाध्यमांवरील भावना

अरुण कहारे

आता पिवळा गोटा ते शिवाजी चौक पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. आता दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासना जवळ ठोस मुद्धा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे अतिक्रमण कायमचे हटू शकते. अतिक्रमण वाले दोन्ही बाजूला बेश्रमासारखे आपल्या बाप…दादाची जागा समजून बसलेले आहेव जुनी z.p. शाळेची भिंत पाडून मागे सरकत आहे. त्यापेक्षा ती जुनी भिंत पाडून नवीन भिंतीला पूर्ण सिमेंट रोड टेकून द्यावा.चार पदरी रस्त्याची आखणी करून घ्यावी . एसलिये लोहा गरम है हतोडा चालना है! प्रशासनाने व नगर परिषदेने ही कारवाई त्वरित अतिक्रमण मोहिमे च्या माध्यमातून राबवावी. तसेच अर्वितील दोन्ही रस्त्याच्या बाजूने भाजीपाला व फळाची दुकाने व चार चाकी गाड्या सर्व इंदिरा मार्केटच्या ओट्यावर बसवावे. जसे इंदिरा मार्केट मधील मटण मार्केट वर्धा रोड तलाव रोडला नेले खाणारे लोक तिथे जातातच ना मग एवढे मोठे भाजी मार्केट अर्विला आहे व ओटे सुद्धा आहेत.म्हणजेच भाजी मार्केट चे केंद्रीकरण होईल व एकाच ठिकाणी सर्व लोक भाजी, फळे इत्यादी वस्तू विकत घ्यायला येतील. अशी जनतेची प्रतिक्रिया आहे..

नंदकिशोर थोरात

नंदकिशोर थोरात अतिक्रमण हट्विल्या शिवाय रस्तायवारी रहादारी मोकळी होणार नाही. कारण दुकानदाराचे समोर भाजी, फ्रुट, ढोले कडून येणारे गिराहीक, किंवा कुलरचे गिराहीक, आपल्या गाडया रोडवर उभ्या करतात ताय्यामुळे ट्रॅफिक जाम होते. करिता अतिक्रमन हटविणे जरूर आहे. तसेच दिनांक 23/06/2025 पासून शाळ्या सुरु होणार आहे. रोडवर गर्दी होणार आहे त्यामुळे अतिक्रमण काढणे आवश्यक आहे. धन्यवाद.

प्रा. धर्मेंद्र राऊत

अतिक्रमण करणे हा आर्वी तील दुकानदारांना हक्क वाटायला लागलं भाऊ कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता अतिक्रमण हटले पाहिजे

संदेश ठाकरे

जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे अतिक्रमण आर्वी शहरात खूपच वाढलेलं असून त्यांच्या शेडला थोडा जरी धक्का लागला पाच २५ जणा मिळून मारहाण सुद्धा करतात त्यामुळे यांचा मुलाजा न करता अतिक्रमण हटवायलाच पाहिजे एक वेळा सर्वांनी एकत्र येऊन याचा विरोध करून सर्व अतिक्रमण हटवायलाच पाहिजे

मनोज माहुरे

मानवी प्रवृत्ती आहे बोट दिल कि हाथ पकडण्याची यावर तुम्ही समजू शकता किती ही आळा घालतो म्हटलं तरी शक्य होत नाही याला अपवाद राहू शकते काही लोक पण max लोक बोट भर दिल कि अंगभर करतात तुम्ही थोडं रात्री एक फेरफटका मारा अतिक्रमण दुकानात म्हणजे समजेल जसं कि विकत घेऊन ठेवलं आहे govt नालीवर घर, संडास काय, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या काय, घरा मागे इतकी जागा असून सुद्धा रोडची जागा कितीक दाबू आणि कितीक नाही अशी ही मानवी अवस्था आहे आता तुम्हीच सांगा खरंच इतके समजदार लोक आहेत का आपल्या भारतात इतकंच अतिक्रमण किंवा दुकान लावायचे असेल तर भाजी मार्केट किती खाली असते तिथे कोणी लावणार नाही सगळे रोड वरच जाऊन बसणार आणि आपण लोक पण जितके जवळ पडते  म्हणून तिथून खरेदी करतो त्यामुळे भाजी मार्केट ला बसणारे कडे ग्राहक पण कमी असतात यावर पण विचार व्हायला पाहिजे चला असो हे माझं मत आहे

प्रा. अभय दर्भे

वाहतुकीला अडचण अतिक्रमण आहेच ते काढलेच पाहिजे मात्र वाहन चालक किती नियम पाळतात हे पहा दुकानात जाताना वाहन रोड उभे करतात जागा असतांना, गुरुवारला व इतर दिवशी सुद्धा एकेरी वाहतूक सुरु असताना  वाहने सिमेंट रोड उभे दिसतील छत्रपती शिवाजी चौक येथील परिस्थिती काय असते वाहतूक रहदारीचे नियम कोणी पाळत नाही यावर विचार होणे गरजेचे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button