Maharashtraआंदोलन

…..अखेर आमदार दादाराव केचे यांचा निश्चय  व  जन आक्रोश समितीचा प्रयत्न झाला सफल, व्दिभाजक होणार चार फुटाचा, लगेच होणार काम सुरू 

आर्वी,दि.१८:- आमदार दादाराव केचे यांनी केलेला निश्चय व जन आक्रोश समितीचा प्रयत्न अखेर बुधवारी (ता.१८) अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सफल झाला. उर्वरीत व्दिभाजक सुध्दा चार फुटाचा करण्यात येईल असे  ठरवीण्यात आले आणी लगेच कामाला सुध्दा सुरुवात होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अवध्या चार दिवसात आर्वीकर जनआक्रोष समितीला हे यश प्राप्त झाले आहे.
नगर परिषद कार्यालयापासुन पुढील व्दिभाजक दिड मिटरचाच व्हावा या करीता गत चार दिवसापासुन जन आक्रोश समितीचे प्रयत्न सुरू होते. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी तथा आमदार सुमीत वानखेडे यांना सुध्दा निवेदन दिले. तद्नंतर बुधवारी (ता.१८) आमदार दादाराव केचे मुंबईवरुन येत असल्याचे जन आक्रोष समितीच्या समन्वय समितीला कळले. त्यांनी त्यांना शिवाजी चौकातच अडवीले आपली मागणी सांगीतली. त्यांनी सुध्दा वेळ न दौडता लगेच अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधुन लगेच दुपारी १२ वाजता बैठक बोलावली.
आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात विश्राम गृहात झालेल्या या बैठकीत केंद्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता बोरकर, कार्यकारी अभियंता जगताप, अभियंता इनामदार आदि अधिकारी व जन आक्रोष समितीच्या समन्वय समिती सदस्या सोबत चर्चा झाली. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणावर जावुन मोजमाप सुध्दा करण्यात आले. दिड मिटरचा व्दिभाजक निर्माण् केल्या नंतर सुध्दा वाहतुकीला अडचण होत नाही हे पटवुन देण्यात जन आक्रोष समितीच्या सदस्यांना यश प्राप्त झाले.  तिन फुट व्दिभाजक करण्याकरीता अधिकारी तयार झाले मात्र जन आक्रोस समितीचे सदस्य दिड मिटरच्याच  व्दिभाजकाच्या मागणीवर ठाम राहिले शेवटी आमदार दादाराव केचे यांचा शब्द कायम ठेवत चार फुटाचा व्दिभाजक तयार करण्याकरीता सर्वांचे एकमत झाले आणी कामाचे नारळ फोडण्यात आले.
  या बैठकीत जन आक्रोश समन्वय समितीचे सदस्य दशरथ जाधव, पंकज गोडबोले, राजपाल भगत, ॲड. दिलीप ठाकरे, मनीष उभाळ, मिथुन कोरडे, बाळाभाऊ नांदुरकर, विनय डोळे, विजय वाघमारे, गौतम कुंभारे, सुनील लोखंडे, हेमंत काळे, सतिश शिरभाते, नितीन आष्टीकर, उमंग शुक्ला आदींनी व्दिभाजक दिड मिटरचाच का करण्यात यावा याकरीता स्पष्ट पणे भुमीका मांडली. तर अनिल जोशी, विजय अजमीरे, सुर्यप्रकाश भट्टड, प्रा. अभय दर्भे, सुशीलसींह ठाकुर, प्रा. धर्मेंद्र राऊत, मनोज आगरकर, धनंजय घाटनासे, रवी गोडबोले, लवेश गलोले, रोषण पवार, एस अंभोर, नरेश गेडाम, गौरव कुऱ्हेकर तथा शहरातील गनमान्य नागरीकांनी सुध्दा आपले मत मांडल्याने हे शक्य झाले.
आमदार दादाराव केचे यांची भुमीका ठरली महत्वाची 
नगर परिषद कार्यालयापासुन पुढील व्दिभाजक अर्ध्या मिटरचाच होणार असल्याची माहिती मिळताच आमदार दादाराव केचे यांनी शनिवारी (ता.७) रस्त्यावर जावुन बांधकाम थांबवीले आणी दिड मिटरचाच व्दिभाजक होईल अशी ठाम भुमीका घेतली. बांधकाम थांबले. काही समाज कंटकांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुध्दा केला मात्र ते आपल्या भुमीकेवर ठाम राहिले आणी शेवटी नागरिकांच्या अपेक्षा पुर्ण झाल्या.
समाजकंटकाने व्हिडीओ तयार करुन केली दिशाभुल
संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणुन मिरवीणाऱ्या एका समाजकंटकाने झाडाजवळ उभ राहुन काढलेल्या व्हिडीओच्या माध्यमातुन नागरिकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे जन आक्रोष समन्वय समितीच्या सदस्यांना बदनाम करुन त्यांच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे हे प्रयत्न शांततेने हानु पाडण्यात आले. अशा या समाज कंटकाला आमदारांनी आपल्या पासुन दुर ठेवावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
झाडतोड प्रकरणी खटल्यात सहभागी होणार
महामार्गाच्या बांधकामात येणाऱ्या झाड तोडी संबंधी पर्यावरण संरक्षण समितीच्या देश्पांडे यांनी नागपुर खंडपिठात दाखल केलेल्या खटल्याविरुध्द तत्पुर्वीच शासनासोबतच नागरिकांची याचीका दाखल झाली असती तर हि परिस्थीती आली नसती. तत्कालीन संघर्ष समितीने याकरीता सुमारे २० हजाराच्यावर नागरिकांच्या सह्या घेतल्या मात्र अध्यक्ष निलेश देशमुख यांनी त्याचा सदोउपयोग करुन घेतला नाही. आता या खटल्यात नागरिकांच्यावतीने वकील उभा करण्यात येणार असुन झाडांचा सुध्दा प्रश्न तातडीने सोडवीण्याकरीता जन आक्रोष समिती सरसावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button