***पावसाने खोलली गटार योजनेच्या कामाची पोल *** खासदार अमर काळे यांच्या घरालगत कोसळला सिमेंट रस्ता**** पडल मोठ भगदाड दोष कुणाचा,**** कंत्राटदाराच की काम करुन घेणाऱ्या विभागाचा*****
भुयारी गटार योजनेच बांधकामच निकृष्ठ दर्जाच, अभियंता म्हणतात मजबुतीकरणाला सहा महिने पाहिजे, दोष कुणाच कंत्राटदाराचा की अधिकाऱ्यांचा, चौकशी करायला लावुन कारवाई करायला लावणार – खासदार काळे

आर्वी,दि.१५:- शनिवारी (ता.१४) सायंकाळी आलेल्या पहील्या पावसाने भुयारी गटार योजनेची पोल खोलली असुन खासदार अमर काळे यांच्या घरालगत बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याला मोठे भगदाड पडले. तेथे एक प्रकारे भुयारी मार्गच तयार झालेला आहे. यात दोष कुणाचा कंत्राटदाराचा की काम करुन घेणाऱ्या महाराष्ट्र जिवन प्राधीकरण व नगर परिषदेचा असा सवाल नागरीकांचा आहे.
शहरात गत चार ते पाच वर्षा पासुन भुयारी गटार योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाच्या देखरेखी खाली सुरू आहे. यातील पहिल्याच टप्याचे काम पुर्ण झाले नाही. मध्येच हे काम बंद पडले होते. तब्बल दोन वर्षा नंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. वसंत नगर मध्ये १२ फुट खोलीकरण करुन काही चेंबर बनवीले. मात्र खासदार अमर काळे यांच्या घरालगतचा मुख्य चेंबर काही बनवीला नाही. तो चार दिवसा आधी अननफानन मध्ये बनवीला मात्र उर्वरीत काम काही केले नाही. नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या आदेशाने कंत्राटदारने यावरच रस्ता सिमेंटी करणाचे काम सुरू केले. या दरम्यान शनिवारी (ता.१४) सायंकाळी जोरदार पाऊस आला. या पावसाचे पाणी भुयारी गटार योजनेकरीता खोदलेल्या भागात शिरला आणी रोड खाली पोकळी निर्माण झाली व सिमेंटकरण केलेला रस्ता तर कोसळलाच शिवाय मुख्य चेंबर सुध्दा खाली बसल्याने निकृष्ट दर्जाच्या गटार योजनेची पोलखोल झाली.
भुयारी गटार योजनेच बांधकामच निकृष्ठ दर्जाच
या गटार योजनेचे काम पुर्वी पासुनच निकृष्ट दर्जाचे होत आहे. गडर टाकण्याकरीता खोदलेल्या खड्यातुन निघालेली माती बाहेर नेवुन टाकायची होती ती तिथेच पसरवील्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. मुरूम टाकुन खड्डा बुजवायचा असतो मात्र खड्यामधुन निघालेल्या मातीचाच वापर करुन खड्डे कसेबसे बुजवील्या गेले आहे. याची दबाई चांगल्या प्रकारे झालेली नाही. तर दुसरीकडे चेंबर करीता वापरलेल्या विटा, सिमेंट मसाला एकदम निकृष्ट दर्जाचे आहे. हाच प्रकार खासदार अमर काळे यांच्या घरा लगतचा चेंबर बनवीतांना झाला आणी निकृष्ठ दर्जाच्या बांधकामाची पोलखोल झाली.
अभियंता म्हणतात मजबुतीकरणाला सहा महिने पाहिजे
गटार योजनेच्या कामाकरीता खोदलेल्या खड्याची योग प्रकारे भराई करुन पाण्याचा वापर करुन व त्याची दबाई केल्या नंतर तेवढया जागेवर जिथे सिमेंटी करणाचा रस्ता असेल तिथे सिमेंटीकरण व जिथे डाम्बरी करणाचा रस्ता असेल तेथे डांबरीकरण करण्याच काम करुन घेण्याची जबाबदारी अभियंत्याची आहे. मात्र महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाचे अभियंते गजभीये यांनी सांगतांना, खोदलेला खड्डा बुजवील्यानंतर नैसर्गीक रित्या मजबुती करणाकरीता सहा महिणे लागतात तत्पुर्वीच नगर परिषदेने त्यावर रस्त्याचे बांधकाम सुरू केल्याने हे सगळ घडल असल्याची माहिती देवुन खड्डा बुजवीण्याकरीता झालेल्या दिरंगाईचे समर्थन केले.
दोष कुणाच कंत्राटदाराचा की अधिकाऱ्यांचा
महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाच्या अभियंत्यांनी गटार योजनेकरीता खोदलेले खड्डे योग्य प्रकारे भराई करुन घेण्याकरीता दिरंगाई केली आहे. जर योग्य प्रकारे भराई करुन त्याची दबाई करुन घेतली असती तर, पावसाच्या पाण्याने वरवर टाकलेली माती दबुन खड्डा निर्माण झाला नसता आणी सिमेंटीकरण केलेला रस्ता कोसळला नसता असे नागरिकांचे मत असुन याला दोषी, कंत्राटदार आहे की अधिकारी आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आहे.
चौकशी करायला लावुन कारवाई करायला लावणार – खासदार काळे
शनिवारी (ता.१४) झालेल्या पावसाच्या पाण्याने गटार योजनेव्दारे तयार केलेले चेंम्बर दबवुन पडलेल्या खड्डयामुळे सिमेंटीकरणाचा रस्ता कोसळला आहे. याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करायला लावणार णार असल्याचे खासदार अमर काळे यांनी सांगीतले आहे.