प्रहार सोशल फोरमच अनोख आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्ना करीता अडवली आमदार केचे यांची गाडी
आमदार दादाराव केंचे यांनी सुध्दा केला त्यांचा सन्मान

आर्वी,१२:- माजी मंत्री बच्चु कडू यांच्या आंदोलनाला पाठींबा देत येथील सोशल फोरमच्या शेतकरी पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी (ता.१२) शिवाजी चौकात आमदार दादाराव केचे यांची गाडी अडवुन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
येथील प्रहार सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री बच्चु कडू यांची भेट घेवुन आल्या नंतर बाळ जगताप यांच्या नेतृत्वात विविध प्रकारचे आदोलन सुरू केले आहे. बुधवारी (ता.११) तहसीलदार यांच्या दालनात जावुन त्यांच्या समोर अंगावरील कपडे उतरवीले आणी त्यांना मागण्याचे निवेदन दिले.
तर, गुरूवारी (ता.१२) येथील शिवाजी चौकात दडून बसलेल्या पहार सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांची गाडी येतांना पाहुन ती अडवीली आणी तिच्या समोर झोपले. या वेळी बाळ जगताप यांनी शेतकऱ्यांच्या व इतर मागण्या त्यांच्या समोर मांडल्या. आंदोलन करणाऱ्यात बाळा जगताप, सुधीर जाचक, अंकुश गोटेफोडे, छोटू चव्हाण, गोलू वाघ, विक्रम भगत आदिंचा समावेश आहे.
आमदार दादाराव केंचे यांनी सुध्दा केला त्यांचा सन्मान
गाडी थांबवुन आमदार दादाराव केच हात जोडत बाहेर आले. आंदोलकांच म्हणन नम्रपणे एैकुण घेतल. त्यांच्या मागण्या रास्त असल्याची कबुली सुध्दा दिली या मुळे आश्वस्थ झालेल्या आदोलकांनी अडवीलेला रस्ता सोडला, यानंतर बाळ जगताप यांच्या नेतृत्वात दिलेले निवेदन त्यांनी सन्मानाने स्वीकारुन येत्या अधीवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न विधान परिषदेत लावुन धरणार असल्याचे आश्वासन सुध्दा दिले.