माजी मंत्री बच्चु कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आर्वीच्या शेतकऱ्यांचा पाठींबा
शेतकऱ्यांनी अंगावारील कपडे काढुन ठेवले तहसीलदारांच्या, साहेब ! अंगावर कपडे होते आता ते पण घ्या ! टेबलवर.

आर्वी, दि. ११ :- शेतकऱ्यांची कर्ज माफी व विविध १७ मागण्यांकरीता माजी मंत्री बच्चु कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी जवळ गत चार दिवसापासुन अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठींबा देत प्रहार सामाजीक संघटनेचे अध्यक्ष बाळ जगताप यांच्या नेतृत्वात बुधवारी (ता.११) शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. साहेब! अंगावरील कपडे होते ते पण घ्या असे म्हणत अंगावरील कपडे तहसीलदार यांच्या टेबलवर काढून ठेवले व मागण्यांचे निवेदन सुध्दा दिले.
या आंदोलनात, बाळ जगताप यांच्या सह सुधीर जाचक, विक्रम भगत, संजय कुरिल, कुणाल चव्हाण, राजेश आगरकर, गुड्डू पठाण, अबरार खान, शेख जफर, अब्दुल राहिल, शेख कलीम, अंकुश गोटेफोडे, प्रवीण वाघ, प्रफुल कुंबोत, मंगेश कोल्हे, धीरज गिरडकर, राजू देऊळकर, किरण लोखंडे, शेख इकबाल यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपये मानधन. हमीभावावर २०% अनुदान. ०७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे. तरुणांच्या हाताला काम व योग्य दाम देण्यात यावे. रोजगार भरती करण्यात यावी. शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांना सुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात यावे. शेतमजुरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे. शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा घरकुलाला ५ लाख रुपयाचे अनुदान देण्यात यावे. याशिवाय मेंढपाळ, मच्छीमार , ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याशी सलग्नीत विविध मागण्यांचा समावेश असुन याचे समर्थन केले आहे.
मताकरीता शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारचा निषेध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची मते मिळवीण्याकरीता कर्ज माफीचे आश्वासन दिले. मात्र सत्तेवर आल्या बरोबर आपल्या शब्दा पासुन फिरले. कर्ज माफीच नाव सुध्दा काढत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही मात्र दुसरीकडे महागाई डोंगरासारखी वाढत आहे. यात शेतकरी होरपळल्या जात आहे. याकडे लक्ष द्यायला सरकार कडे वेळ नाही. अशा शेतकरी विरोधी निर्लज्ज सरकारचा आम्ही निषेघ करतो अशा शब्दात बाळ जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.