“ फुले” चित्रपटाला कर मुक्त करा, देशभरातील सिनेमा गृहात प्रदर्शीत करा
आदर्श एकता सामाजिक संघटनेची मागणी

आर्वी,दि.३:- महाराष्ट्राचे भुषण महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जिवनावर आधारीत “ फुले” चित्रपटाला कर मुक्त करुन देशभरात प्रदर्शीत करण्याची व्यवस्था करा अशी मागणी येथील आदर्श एकता सामाजीक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली असुन त्यांनी तहसीलदार हरिष काळे यांच्या माध्यमातुन निवेदन पाठवीले आहे.
जाती धर्माच्या बेड्या दुर सारुन दलीत, शोषीत समाजाकरीता झटणारे महात्मा ज्योतीबा फुले हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील नागरिकांकरीता आदरस्थानी आहे. त्यांच जिवन चारीत्र हे नवीन पिढी करीता बोधपुर्ण असुन यातुन चारीत्र्यवानच नाही तर देशहीता करीता काम करणारी पिढी निर्माण करण्याकरीता मदत होणार आहे. करीता ज्या प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावर आधारीत “छावा” हा चित्रपट करमुक्त करुन देशभरात प्रदर्शीत करण्यात आला. त्याच धर्तीवर “ फुले” चित्रपटाला कर मुक्त करुन देशभरात प्रदर्शित करण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने करावी अशी मागणी येथील आदर्श एकता सामाजीक संघनच्यावतीने निवेदन देवुन करण्यात आली आहे.
निवेदन देणाऱ्यांमध्ये गौतम अशोकराव कुंभारे, गजानन गायकवाड, सुनील खोरगडे, अनिल तायडे, मंगेश सरोदे, तेजस मनोहरे, शोभीत कुंभारे तथा आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचा समावेश आहे.