नेरीच्या जि.प.उच्च प्राथमीक शाळेने महाराष्ट्र दिनी राबवीला आगळावेगळा उपक्रम, शाळेतुन गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विध्यार्थ्यांना दिला ध्वजारोहण करण्याचा मान
महाराष्ट्र दिन सोहळा व माझी वसुंधरा ५.० अभियान उत्साहात संपन्न
आर्वी,दि.१:- सातत्याने नवनवीन उपक्रम राबवुन नावालैकीकास आलेल्या मिर्झापुर (नेरी) येथील ग्रामसंसदेन जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळेतुन गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विध्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनी गुरूवारी (ता.एक) ध्वजारोहण करण्याचा मान देवुन त्यांचा सन्मान केल्याने याची सर्वत्र प्रसंशा केल्या जात आहे. सोहम प्रमोद कठाणे व यश जगदीश कामडी असे हा मान मिळवीणाऱ्या विध्यार्थ्यांची नावे आहेत.
या कार्यक्रमाला सरपंच बाळा सोनटक्के, उपसरपंच सिद्धार्थ काळपांडे, सदस्य महेश कठाणे, शामराव वाळले, मनोरमा नेवारे, शा. व्य. समीती अध्यक्षा सौ. वर्षाताई कठाणे, अनीता कामडी, प्रशांत कडु, मुख्याध्यापक प्रमोद पांडे, प्रफुल कांबळे, विवेक कहारे, वाकेकर, रंजना नारे, शामराव अटेल, नीलकुमार श्रीवास्तव, विशाल राऊत, हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी माझी वसुंधरा ५.० अभियाना अंतर्गत घरोघरी कंपोस्ट खत (गांडूळ खत) निर्मिती सुरु करावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले. तांञिक दृष्टीने योग्य कंपोष्ट खड्डयाला ग्रामपंचायत तर्फे ५ हजार, ३ हजार,२ हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
यावेळी बाळ सोनटक्के यांनी मार्गदर्शन करतांना, विध्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी व शिक्षणात गोडी निर्माण होवुन भविष्याचे वेध घेण्याची क्षमता निर्माण व्हावी या करीता हा उपक्रम राबवीण्यात आला असल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या मनात गावा विषयी आपुलकी व गावकऱ्यांप्रती कायम प्रेम असवा हा या मागचा उद्देश असल्याचे सांगीतले.
वसुंधरा अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत चांगली कामगीरी बजावणाऱ्या विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामविकास अधिकारी शेंदरे यांनी मांडून आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता शाळेचे शिक्षक, गावकरी व विध्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.