अंतोरा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विध्यालयाने पटकावीला व्दितीय क्रमांक
“मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा” तालुका स्पर्धेचे मिळाले दोन लाख रुपयाचे बक्षीस

आर्वी,दि.१:- आष्टी तालुक्याच्या अंतोरा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विध्यालयाने गत एक वर्षा पासुन शाळेत राबवीलेल्या विविध उपक्रमाची दखल शासनाने घेवुन तालुका स्तरीय स्पर्धेच्या व्दितीय क्रमांकाच्या बक्षीसास पात्र ठरवीले असुन दोन लाख रुपयाचे पारीतोषीक देण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील अंतोरा सारख्या ग्रामीण भागात मोहोड परिवाराने शैक्षणीक संस्थेच्या माध्यमातुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविध्यालयाची स्थापना करुन गोरगरीब विध्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. गत ५५ वर्षा पासुन समाज सेवेचे हे व्रत या माध्यमातुन सुरू असुन या शाळेमधुन निघालेले अनेक विध्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत.
या शाळेने आपली परंपरा तुटू न देता गत एक वर्षा पासुन विविध शैक्षणीक कार्यक्रम राबवीले आहेत. यात सराव घटक चाचणी, महापुरूषांची जयंती साजरी करुन त्यांच्या कार्याची माहिती देणे, शैक्षणीक सहलेच्या माध्यमातुन एैतीहासीक माहितीची जान विध्यार्थ्यांना करुन देणे, पोलीस शस्त्र प्रदर्शनीच्या माध्यमातुन आधुनीक शस्त्राची माहिती देणे, विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना पाचरण करुन त्यांच्या मार्गदर्शनाची सोय करुन देणे, महिलांकरीता हळदिकुंकू सारखे पारंपारीक कार्यक्रमाचे आयोजन करणे, चित्रकला, मैदानी खेळ आदिंचे आयोजन करणे या शिवाय अनेक उपक्रम या दरम्यान राबवीण्यात आले. याशिवाय मुख्यध्यापकांचा अनुभव आणी शिक्षकांची मेहनत यांच्या समन्वयाने या शाळेने चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
याची दखल शासनाने घेतली असुन शाळेला “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर” स्पर्धेच्या तालुका स्तरावरील व्दितीय क्रमांकाकरीता पात्र ठरवीले असुन दोन लाख रुपयाचे बक्षीस प्रदान केले आहे. याचे सर्व स्तरावरुन कौतूक केल्या जात आहे.