१९४९ चा बीटी कायदा रद्द करा, बुध्दगयाच व्यवस्थापन बौध्द अनुयायांना द्या
आदर्श एकता सामाजीक संघटनेची मागणी, खासदार अमर काळे यांना दिले निवेदन

आर्वी,दि.१:- सन १९४९ चा बी टी कायदा रद्द करुन बुध्द गयाचे व्यवस्थापन फक्त बौध्द अनुयायांकडे देण्यात यावे याकरीता गत अनेक वर्षा पासुन सुरू असलेल्या लढ्याला पाठींबा द्या. या मागणी करीता आदर्श एकता सामाजीक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी (ता.एक) खासदार अमर काळे यांना निवेदन दिले आहे.
तथागत भगवान बुध्द यांना महाबोधी बुध्द विहार येथे ज्ञान प्राप्ती झाली होती आणी येथुनच बुध्द धर्माचा प्रसार आणी प्रचार जगात केल्या जातो. संपुर्ण जगातील बौध्द अणुयायी या ठिकाणाला भेटी देत असल्याने बौध्द गयाचे व्यवस्थापन ज्यांना बौध्द धर्माचे ज्ञान आहे अशांकडेच राहणे योग्य आहे. मात्र सन १९४९ च्या बी टी कायद्याने याला बंधन घातले आहे आणी हे बंधन मोडीत काढण्याकरीता सन १९४९ चा कायदा रद्द करणे गरजेचे आहे. या मागणी करीता गत तिन महिण्यापासुन हजारो भंते व बुध्द अनुयायी उपोषणाच्या माध्यमातुन आंदोलन करीत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देवुन सन १९४९ चा कायदा रद्द करण्याकरीता प्रयत्न करावे अशी मागणी या निवेदना मधुन करण्यात आली आहे.
निवेदन देणाऱ्यांमध्ये गौतम अशोकराव कुंभारे, गजानन गायकवाड, मंगेश सरोदे, शोभीत कुंभारे व आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य कार्यकारणी सदस्यांचा समावेश आहे.