प्रदीप गौतम यांची शिवसेना (ठाकरे ) पक्ष्याच्या समन्वयक पदी नियुक्ती
आर्वी, दि. 20:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष्याच्या वर्धा जिल्हा, आर्वी विधानसभा समन्वयक पदावर गौतम उर्फ सनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
पक्ष प्रमुखं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, पश्चिम विदर्भ संपर्क नेते खासदार अरविंद सावंत, पश्चिम विदर्भ समन्वयक अरविंदजी नेरकर यांच्या सूचनेनुसार, वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे
नियुक्ती पत्र देतावेळी आर्वी उपजिल्हा प्रमुख नितीन सहारे, देवळी उपजिह्वा प्रमुख रमेश कडू,देवळी विधानसभा संघटक नरेश ठाकूर, देवळी तालुका संघटक संजय कपूर, वर्धा प्रसिद्धी प्रमुख श्याम परशुडकर, माजी तालुका प्रमुख बाबारावं पवार, युवासेना तालुका अधिकारी संभव इंगोले, सुरज खांडेकर यांच्या सह समस्त शिवसेना पदाधिकारी उपस्थिती होते. यावेळी त्यांनी गौतम यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या