जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते अनील जोशी यांचा ७१ वा वाढदिवस झाला साजरा, त्यांनी घेतला आगळावेगळा निर्णय, परिवाराच्या सम्मतीने केला मरणोपरांत देहदानाचा संकल्प

आर्वी,दि.१४:- विविध महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते अनील जोशी यांचा रवीवारी (ता.६) नेहमी प्रमाणे साध्या पध्दतीने ७१ वा वाढदिवस साजरा झाला. यावेळी त्यांनी परिवाराच्या सम्मतीने मरणोपरांत देहदान करण्याचा आगळावेगळा संकल्प करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
विध्यार्थी दशेपासुनच मजुबत संघटन निर्माण करण्याचे कसब असलेल्या अनील जोशी यांची राजकारणच नव्हे तर सामाजीक कार्यात सुध्दा जबरदस्त रुची होती. विध्यार्थी संघाच्या निवडणुकाच नाही तर नगरपरीषद, विधानसभा, सहकारी संस्थांच्या निवडणुका आदिंमध्ये त्यांचा सल्ला महत्वाचा ठरत असे त्यांनी तयार केलेल्या रणनितीचा अनेकांना लाभ झाला असला तरी राजकीय क्षेत्रातील कोणताच लाभ त्यांनी घेतला नाही. मात्र सहकार क्षेत्राच्या माध्यमातुन ते वर्धा नागरी बॅकेचे संचालकच नव्हे तर सलग १८ वर्ष अध्यक्ष राहिले. या माध्यमातुन त्यांनी बँकेत अनेक सुधारणा घडवून आणल्या, बँकेच संगणीकर तर केलच शिवाय बँकेला सलग अ दर्जा मिळवुन देण्याकरीता परिश्रम घेतले. याशिवाय पुर्ती संस्थेच्या माध्यमातुन चालवील्या जात असलेल्या जामणी साखर कारखाण्याचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच आर्वी तालुका पत्रकार संघाचे सल्लागार सुध्दा आहेत.
क्रिडा क्षेत्राची आवड असलेल्या खेळाडूंची सोय व्हावी याकरीता त्यांनी युवक क्रिडा मंडळाची स्थापना केली होती. या मंडळाच्या माध्यमातुन व्हालीबालचे पट्टीचे खेळाडू निर्माण झाले अनेक विध्यार्थी या माध्यमातुन नौकरीवर सुध्दा लागलेत. अखील भारतीय स्तरावरील व्हालीबॉल सामाने प्रथमच घेण्याचा मान सुध्दा त्यांनाच जातो. ऐवढच नव्हे तर छोट्याछोट्या व्यवसायीकांला लागणाऱ्या पत पुरवठ्याचा विचार करुन त्यांनी सुमारे ३८ वर्षा पुर्वी तेलंगराय पत संस्था निर्माण केली. यामध्यमातुन अनेकांचा व्यवसाय थाटल्या गेला. कुटूंबांची आर्थीक सोय झाली. या दरम्यान अनेक पत संस्था निर्माण झाल्या आणी बंद सुध्दा पडल्या मात्र ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरणारी हि एकमेव संस्था आहे. तर, दुसरीकडे मातंग समाजाच्या दोन अनाथ मुलांना दत्तक घेवून त्यांच्या शिक्षणा पासुन तर सर्वच जिवनावश्यक व्यवस्था करुन देण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.
येवढ्यावरच ते थांबले नाही तर समाजातील दिनदुबळ्या परिवाराला मदतीचा हात देता यावा याकरीता मदत फॉउंडेशनची स्थापना केली. या माध्यमातुन दिवाळी असो अथवा इतर सण गोरगरीबांना आनंदात साजरा करता यावा याकरीता साखर, चहा, धान्य आदिंचा शिधा घरोघरी पोहचवीण्याचा उपक्रम सुध्दा ते सहकाऱ्यांच्या मदतीने राबवीत आहेत. याकरीता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहकारी सुधीर दिवे यांची सुध्दा त्यांना साथ मिळाली.
गोरगरीब तबक्यातीलच नव्हे सातत्याने शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहणाऱ्या समाजातील सर्व घटकांच्या विध्यार्थ्यांची सुध्दा सोय व्हावी याकरीता लक्ष्मणराव ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी संपर्क साधला. या ट्रस्टच्या माध्यमातुन एक हजार ८०० शाळा चालवील्या जात आहे. ट्रस्टच्या संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांना परिसराची माहिती दिली. त्यांच्या पुढे यशस्वी मांडणी केल्यामुळे संचालक मंडळ सुध्दा प्रभावीत झाले आणी येथे होस्टेल चालवीण्याची मान्यता दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने भव्य अशी इमारत बांधून सोईसुवीधा निर्माण केल्या. तर परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाव याकरीता सुध्दा त्यांचे प्रयत्न सुरूच राहतात. वेळोवेळी मेळावे घेतल्या जाते. विध्यार्थ्यांना मोफत प्रशीक्षणाची सोय सुध्दा करुन दिल्या जाते. आणी विशेष म्हणजे आता पर्यंत ४० बेरोजगार युवकांच्या हाताला यामाध्यमातुन काम सुध्दा मिळाले आहे.
अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या अनील जोशी यांनी आता पर्यंतच आपल आयुष्य लोकसेवे करीता खर्ची घातले असले तरी मरणोपरांत सुध्दा आपण जगाच देण लागतो हि भावना त्यांनी मनी बाळगली होती. परिणामी मरणोपरांत देहदान करण्याचा इरादा पत्नी कवीता व मुलगा निलेश यांच्या पुढे मांडल्या. या मागचा उद्देश सुध्दा समजुन सांगीतल. ध्येय्यनिष्ठ जोशी यांच्या प्रबळ इच्छे पुढे ते दोन पाऊल मागे आले आणी आपली संम्मती दर्शवीली. संकल्प सोडण्याचा मुहूर्त ठरला आणी ७१ व्या वाढदिवसाला त्यांनी देहदान करीत असल्याच जाहीर केले. मात्र यामुळे पत्रकार मंडळीच नव्हे तर सर्वांनाच आश्चर्याचा धकका बसला.