तळेगाव (शा.पं.) येथील नामांकीत हॉटेल बॅट अँड बॉल लागली भीषण आग लाखो रुपयाचे झाले नुकसान, कोणतीही जिवीत हाणी झाली नाही
पालक मंत्री पंकज भोयर व आमदार समीर कुणावार होते त्याच हॉटेल मध्ये

आर्वी,दि.१३:- तळेगाव (शा.पं.) येथील नामांकीत हॉटेल बॅट अँड बॉलच्या इमारतीला दुपारी अडीच वाजताचे सुमारास अचानक आग लागली यात लाखो रुपयाची मालमत्ता जळुन खाक झाली. यावेळी जिल्ह्याचे पालक मंत्री पंकज भोयर, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावर सुध्दा येथेच उपस्थीत होते. त्यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती देताच तातडीने अग्नीशमन दल पोहचले आणी त्यांनी आग आटोक्यात आणली सुदैवाने यात जिवीत हाणी झाली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील प्रशासकीय ईमारतीसह इतर विकास कामाचे लोकार्पणव भुमीपुजन होताच जिल्ह्याचे पालक मंत्री पंकज भोयर हिंगणघाटचे आमदार समीर कुणावर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी दुपारी तळेगाव (शा.पं.) येथील नामाकींत बॅट ॲड बाल हॉटेल मध्ये जेवण करण्याकरीता गेले होते. त्यांचे जेवण आटोपताच काही वेळे त्यांनी व्हिआयपी रुम मध्ये चर्चा केली आणी बाहेर निघताच अचाणक आगीचा डोंब उसळला पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. पालक मंत्री पंकज भोयर यांनी प्रशासनाला याची माहिती दिली आणी आर्वी, कारंजा, तिवसा, सेलू आदि ठिकाणावरुन अग्नीशमन दलाचे वाहन पोहचले त्यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. यात हॉटेलच्या फर्नीचर सह किंमती वस्तु जळुन खाक झाले असुन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
अन्यथा मोठी हानी झाली असती
या हॉटेल लगत दुसर एक हॉटेल असुन अग्रवाल यांच पेट्रोल पंम्प सुध्दा आहे. आग ऐवढी भिषण होती की ती कधीही या पेट्रोल पंम्प पर्यंत पोहचू शकली आणी मोठ्या हाणीला समोर जावे लागले असते मात्र अग्नीशमन दलाच्या जवानांनी आपले कौश्यल्य वापरुन तिकडे आग पसरुच दिल नाही.
नागरिकांची तोबा गर्दी उसळली
आग लागल्याची माहिती मिळताच गावातील नागरीक मोठ्यासंख्येने घटनास्थळी पोहचले. पाहता पाहता तोबा गर्दी उसळली होती. यातील काहींनी आग विझविण्याकरीता मदत सुध्दा केली मात्र गर्दी वाढतच जात असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये याकरीता पोलीसांनी त्यांना प्रतिबंध घातले.