इठलापुर येथील कब्रस्थानच्या सुरक्षा संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे यशवंत मजुर कामगार सहकारी संस्थेवर कारवाई करण्याची मागणी
बायलॉज व नियमाचे उल्लंघन करीत असल्याची चर्चा, संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी, जिल्हा निंबधक सहकारी संस्था यांचेकडून संस्थेवर कारवाईची अपेक्षा

आता पासुनच फुटले कॉलम, यावर सुरक्षा भिंत कशी कायम राहणार
आर्वी,दि.१२:- इठलापुर येथील कब्रस्थानाच्या सुरक्षा संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असुन हि भिंत अल्पावधीतच कोसळण्याची शक्यता असल्याने कंत्राटदार यशवंत मजुर कामगार सहकारी संस्था वर्धा आणी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्वीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे.
अल्पसंख्याक निधी २०२३-२४ मधुन इठलापुर येथील कब्रस्थानाच्या सुरक्षा संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. वर्धा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या कामाचे कंत्राट वर्धा येथील यशवंत मजुर कामगार सहकारी संस्थेला दिले आहे. जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्वीच्या नियंत्रणात हे बांधकाम सुरू आहे. मात्र या संस्थेने कामाची सुरूवातच निकृष्ट दर्जाची केली आहे. इस्टीमेट प्रमाणे अर्थवर्कचे काम केलेले नाही. सेंट्रीग लावुन नंतरच कॉलम भरल्या गेले पाहिजे होते मात्र अस न करता विटाचा वापर करुन कॉलमचा भरणा केल्या गेला आहे यामुळे कॉलमचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याला नियमानुसार पाणी दिल्या पाहिजे होते मात्र अस न केल्याने कॉलमचे काम ठिसुळ झालेले आहे. परिणामी आता पासुनच कॉलमला भेगा पडलेल्या असुन त्याचे तुकडे पडत आहे. इस्टीमेट प्रमाणे कालमचा खड्डा मुरूमाने भरणे आवश्यक आहे मात्र हे महाशय मुरूमा ऐवजी काळ्यामातीचा भरणा करीत असल्याचे आढळुन आले आहे. कॉलम करीता वापरलेल्या सळई इस्टीमेट मध्ये उल्लेखीत गेजचे नसल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असुन अशा पध्दतीने निर्माण होणारी सुरक्षा भिंत अल्पावधीतच कोसळण्याची शक्यता आहे.
करारनाम्याप्रमाणे अटी व शर्तीचे पालन न करता निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या यशवंत मजुर सहकारी संस्थेवर कारवाई करुन त्यांचे कडून सुरक्षा भिंतीचे काम काढून घेण्यात यावे तसेच या संस्थेची नोंद काळ्या यादीत घेण्यात यावी अशी मागणी आहे.
आता पासुनच फुटले कॉलम, यावर सुरक्षा भिंत कशी कायम राहणार
बायलॉज व नियमाचे उल्लंघन करीत असल्याची चर्चा
संस्था सदस्यांच्या हाताला काम मिळावे याकरीता बांधकाम विभागाच्या माध्यमातुन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या शिफारीशीने मजुर कामगार संस्थेला काम दिल्या जाते. संस्थेच्या बायलॉज् व नियमाप्रमाणे हि कामे मजुर कामगार संस्थेच्या सदस्यांनीच केली पाहिजे असा नियम आहे. मात्र मजुर कामगार संस्था याचे पालन करीत नाही. पाच दहा टक्के कमीशन घेवुन बाहेरच्या व्यक्तीला कामे देत असतात असाच प्रकार या संस्थेने सुध्दा केला असल्याची जोरदार चर्चा असुन आष्टी येथील एका कंत्राटदारला हे काम दिले असल्याचे बोलल्या जात आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वर्धा व तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वर्धा यांनी याची सखोल चौकशी करुन सदर संस्थेवर सहकारी संस्था अधिनियमा अन्वये कारवाई करावी अशी मागणी आहे.
खड्डा खोदतांना निघालेल्या काळ्या मातीने कॉलम भरतांना मजुर