Uncategorized

सत्कार समारंभात एका पदाधिकाऱ्याची वाजली टकली !

परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात जोरदार चर्चा, तो कोण? माहिती जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई पर्यंत पोहचली!

वर्धा,दि.२६:- काही दिवसापुर्वी एका मोठ्या नेत्याचा सत्कार समारंभ झाला या समारंभात बिन बुलाया मेहमान म्हणुन गेलेल्या जिल्ह्याच्या एका मोठ्या पदावर असलेल्या पदाधिकाऱ्याची टकली वाजवील्याची जोरदार चर्चा परिसरातच नव्हे तर जिल्ह्याभर पसरली असुन तो पदाधिकारी कोण? या विषयी तर्कवितर्क लावल्या जात आहे.

लाळघोटेपणा करण्यात तरबेज असलेला हा पदाधिकारी तत्पुर्वी याच नेत्याच्याघरी आपली पायधुळ झटकत होता. कधी वाहनाचा चालक बनुन तर, कधी कार्यक्रमाच्या आयोजनात स्वत:हुनच जबाबदारी अंगावर घेवुन पुढे पुढे करीत होता. यामुळे त्याचेवर नेत्याचा जबर विश्वास बसला. त्याने आपली सगळी गुपीते त्याच्यासमोर उघड केली. एवढच नव्हे तर स्वत:चा मोबाईल त्याचे जवळ देत होता. या पदाधिकाऱ्यानं याचाच लाभ उचलाला आणी स्वत:च्या लाभा करीता विश्वास घात केला. पडतीच्या काळात रातो रात निष्ठा बदलली आणी रात्रीच्या अंधारात उगवत्या सुर्याला नमस्कार करीत त्यांच्या घरी पोहचला. सकाळी उठताच नेत्याला जेव्हा हे कळल तेव्हा त्यांचाच नव्हे तर परिवारातील प्रत्येकाचा पारा भडकला आणी टकली वाजवायचीच असा पक्का निर्धार केल अस चर्चे दरम्यान सांगीतल्या जाते.

मात्र लोकनेत्याचा विश्वास घात झाला असला तरी पक्षाच्या नेत्यांनी आपला शब्द पाळला आणी त्यांना मोठ्या पदावर विराजमान केले. काही दिवसापुर्वी त्यांचे आगमन झाले. यावेळी गावकऱ्यांनीच नव्हे तर परिसरातील नागरीकांनी जंगी स्वागत केले. यावेळी कार्यक्रम सुध्दा झाला. या कार्यक्रमाचे निमंत्रण नसतांना सुध्दा हा पदाधिकारी आपल्या पदाची गरीमा खुट्यावर टांगुन सभा मंच्याच्या आजुबाजुला रेंगाळत बसला आता तरी आपल्याला बोलावेल अशी त्याची धारण होती मात्र कुणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्याने सभा मंचवर स्वत:हुनच चढण्याचा प्रयत्न केला. हि गोष्ट दोन भावंडाच्या लक्षात आली पहिली पायरी चढत नाही तोच त्याला खाली खेचले. सभा मंडपाच्या बाजुला नेले आणी लाथाबुक्यानीच नाही तर त्याची टकळी सुध्दा जोरदार वाजवील्याची चर्चा आहे. हि चर्चा पाहता पाहता परिसरातच नव्हे तर, जिल्ह्यात सुध्दा पोहचली असुन मुंबई पर्यंत पोहचली असल्याची शक्यता वर्तवील्या जात आहे.

यापुर्वी सुध्दा याला खेळ मैदानावर एका सामाजीक संघटनेच्या मुख्य पदावर असलेल्या सामाजीक नेत्याने जबरदस्त चोप दिला होता. याशिवाय फौजदारी स्वरुपाच्या अनेक प्रकरणात हा गुंतला असल्याची जोरदार चर्चा चौका चौकात सुरू असली तरी बेशरम तो बेशरमच त्याला कसलीच लाज लजा नसते असे बोलल्या जात असुन कपडे छटकुन पुन्हा तो मैदानात उतरेलच अशी संभावना व्यक्त केल्या जात असली तरी, तो पदाधिकारी कोण? या विषयी तर्कवितर्क लावल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button