येणारे सण उत्सव आनंदात व्हावे याकरीता पोलीसांनी कसली कंबर, मार्ग परिक्रमणा करुन केला इरादा व्यक्त तर शांतात समीतीची घेतील बैठक
सण, उत्सवाच पावित्र्य राखल्या गेल पाहिजे, पोलीस बंदोबस्त चोख राहणार

आर्वी,दि.११:- येणारे सण उत्सव आनंदात पार पडावे याकरीता पोलीसांनी कंबर कसली असुन पोलीस पथकाने शहरात मार्ग परिक्रमणा करुन आपला इरादा व्यक्त केला आहे या शिवाय मंगळवारी (ता.११) शांतात समितीची बैठक घेवुन सदस्यां कडून संभाव्य समस्यांची माहिती घेतली आणी शांतता राखण्याकरीता केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव यांच्या अध्यक्षतेखाली ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या उपस्थीतीत ही बैठक पार पडली.
मार्च महिण्यात होळी, धुळीवंदना, छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे जयंती, गुढी पाडवा, रमजान ईद आदि सण उत्सव होत आहे. या दरम्यान कोणतीही अप्रीय घटना घडुन शांतता भंग होवुन नये याकरीता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. शिवाय ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावुन वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्या जाईल. दारु व्यवसायीकांना दोन दिवसा करीता ताब्यात घेतल्या जाणार आहे. तसेच छेडछाडीची घटना घडू नये या करीता साध्या पोशाखातील पोलीस सुध्दा तैणात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
या बैठकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दशरथ जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुशीलसिंह ठाकुर, सामाजीक कार्यकर्ते साखरे, पत्रकार सुर्यप्रकाश भट्टड, गौरव कुंभारे, पत्रकार रवींद्र दारुंडे, टेकचंद मोटवाणी, पिपल्स रिपब्लीक पार्टीचे मेघराज डोंगरे, रहिम कुरेशी, जुनेद नानु राठोड, हाजी वकील खान, जावेद शेख तथा शांतता समितीचे सदस्य उपस्थीत होते.
सण, उत्सवाच पावित्र्य राखल्या गेल पाहिजे
हा महिणा सण आणी उत्सवाचा महिना आहे. या दरम्यान लहान लहान गोष्टींवरूंन वाद निर्माण होवु नये. कुठली ही अप्रीय घटना घडू नये याकरीता सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. रंग लावतांना जबरदस्ती व्हायला नको. वाहतुकीचे नियम पाळल्या गेले पाहिजे. ध्वनीक्षेपकामुळे प्रदुर्षन होवु नये याची काळजी घेतल्या गेली पाहिजे अशा सुचना यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव यांनी देवुन सण, उत्सव हा सर्व धर्मीयांचा सांस्कृतीक ठेवा आहे. याचे पावित्र्य राखल्या गेले पाहिजे अशी अपेक्षा वर्तवीली.
पोलीस बंदोबस्त चोख राहणार
येत्या काळात होणारे सण उत्सव आनंदात पार पडावे याकरीता चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. सुमारे २० ते २५ लोकांना दोन दिवसाकरीता ताब्यात घेतल्या जाणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्या अंतर्गत कारवाई सुध्दा करण्यात येणार आहे. याशिवाय टवाळखोर युवकांकडून मुलीची छेडखानी होवु नये याकरीता साध्या पोशाखातील पोलीस सुध्दा तैनात करण्यात येणार असून कोणत्याही परिस्थीतीला नियंत्रणात आणण्याकरीता पोलीस परिपुर्ण आहे. तरी याकरीता नागरिकांच्या सहकार्याची सुध्दा गरज आहे असे ठाणेदार सतीश डेहणकर यांनी यावेळी सांगीतले.