“सामाजीक व निष्ठावंत कार्यकर्ते सुधीर दिवे यांना विधान परिषदेची संधी द्या” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजप कार्यकर्त्यांनी घातले साकडे, – तर,माजी आमदार दादाराव केचे म्हणतात आपलच शभंर टक्के जमेल
१० ते १७ मार्च पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

आर्वी,दि.१०:- सामाजीक धार्मीक, वैध्यकीय, शेती व शेतकरी हिताकरीता सातत्यांने कार्य करीत असलेले भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते सुधीर दिवे यांना राज्याच्या विधान परिषदेवर जाण्याची संधी द्या असे साकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रवीवारी (ता.९) निवेदन देवुन घातले आहे. तर, दुसरीकडे माजी आमदार दादाराव केचे म्हणतात आपलंच जमेल
प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडाळकर, राजेश विटेकर व आमशा पडवी हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे विधान परिषदेच्या पाच जागा रिकाम्या झालेल्या आहेत. या रिक्त झालेल्या प्रत्येक जागेकरीता गुरुवारी (ता.२७) स्वतंत्र पोटनिवडणुक होत आहे. यातील एक जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला व एक जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. उर्वरीत तिन जागेवर भाजपच्या वाट्याला येणार असुन यावर आपली वर्णी लागावी याकरीता अनेकांचे प्रयत्न सुरु आहे. सामाजीक कार्यकर्ते सुधीर दिवे यांच्याकरीता सुध्दा कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
तालुक्यातील दहेगाव (मुस्तफा) हि कर्म भुमी असलेले सुधीर दिवे हे गत १५ वर्षा पासुन विधान सभा क्षेत्रातच नव्हे तर वर्धा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे सोबतच त्यांनी ‘महात्मा साखर कारखाना, ‘सुचारा फार्म प्रोड्युसर कंपनी, ‘मदर डेरी’आदिंच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचे हित साधण्याचे काम केले आहे. तर, अमरावती येथील ‘अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या माध्यमातुन परिसरातील नागरिकांना रुग्णसेवा पोहचवीण्याचे काम सुध्दा केले आहे याशिवाय धार्मीक कार्यात सुध्दा ते सदा अग्रसर राहत असल्यामुळे त्यांचा शेवटल्या व्यक्ती पर्यंत थेट संपर्क झालेला आहे. तर दुसरी कडे त्यांनी दोन वेळा विधान सभेची उमेदवारी मागीतली होती मात्र देण्यात आली नाही. यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त न करता भाजप उमेदवाराला निवडूण आणण्याकरीता अहो रात्र परिश्रम घेतले. अश्या निष्ठावंत कार्यकत्याला विधान परिषदेवर जाण्याची संधी द्या अशी मागणी भाजपच्या कार्यकत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देवून केली आहे.
योग्य निर्णय घेतल्या जाईल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकत्यांचे म्हणने शांतपणे एैकुण घेतले आणी सुधिर दिवे यांच्या कार्याची दखल घेवुन योग्य तो निर्णय निश्चीतच घेतल्या जाईल असे आश्वासन दिले. या सकारात्मक प्रतिसादामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहे.
१० ते १७ मार्च पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत
या पोटनिवडणुकी करीता १० ते १७ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे या दरम्यान पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेते याकडे भाजप कार्यकत्यांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार दादाराव केचे म्हणतात आपलच शभंर टक्के जमेल
आर्वी विधानसभा क्षेत्रात भाजपची पाळेमुळे रोवण्याकरीता घेतलेले परिश्रम व केलेले कार्य सर्व वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे. जिल्हा परिषद असो अथवा नगर परिषद असो शंभर टक्के यश पक्षाला मिळवुन दिलेल आहे. त्यामुळे मला निवेदन घेवुन पाठवीण्याची गरज नाही आणी भाजप मध्ये निवेदना पेक्षा केलेल्या कामाची गणना केल्या जाते माझा पक्ष श्रेष्ठींवर पुर्ण विश्वास असुन आपलच शंभर टक्के जमेल असे माजी आमदार दादाराव केचे यांनी सांगीतले.