“जुण्या खटल्यांचा निपटारा लवकर करण्याचा विडा सर्वोच्च न्यायालयाने उचलला” – न्यायमुर्ती नितीन सांबरे
आर्वी येथे वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन

आर्वी,दि.९:- अनेक वर्षा पासुन न्यायालयात खटले प्रलंबीत पडले आहेत. यात ३० वर्ष, २० वर्ष व १० वर्षा पर्यंतच्या खटल्याचा समावेश असुन त्यांची विभागणी करण्यात आली आहे. या खटल्यांचा निपटारा लवकरात लवकर करण्याचा विडा सर्वोच्च न्यायालयाने उचलला असुन याकरता दर महिण्याला बैठका घेतल्या जातात अशी माहिती मुबंई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती नितीन सांबरे यांनी येथे दिली.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे त्यांनी नुकतेच उद्घाटन केले या प्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय भारुका हे होते तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके, न्यायमुर्ती मुकूलीका जवळकर, न्यायमुर्ती अमोल सुर्वे, आर्वी बार असोशिएशनचे उपाध्यक्ष ॲड. अवतार गुरूनासिगानी, कारंजाचे ॲड. धारपुरे हे प्रमुख अतिथी होते.
पुढे त्यांनी मार्गदर्शन करतांना, माझा जन्म वर्धा जिल्ह्यातच झाला असुन इथेच शिकलो असल्याचे अवार्जुन सांगीतले. तर, न्यायाधिश हे केवळ दहा ते पाच वाजे पर्यंतच काम करतात अस नाही तर, आठवडाभर पुर्ण वेळ कामात असतात अशी माहिती दिली आणी हे अशिलांपर्यंत पोहचलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय आष्टीकरांच्या नाराजीचा यावेळी उल्लेख करीत त्यांनी, एकाच कुटुंबातील सदस्य म्हटल्यावर निर्णय घेतांना एक भाऊ नाराज होतोच यात नाराज व्हायच काही कारण नाही असे सांगून पुढे नवीन निर्णय सुध्दा होवू शकतो या करीता सकारात्मक विचार केल्या गेल पाहिजे अशा शब्दात नाराजी दुर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
न्यायमुर्ती उर्मीला जोशी-फालके यांनी मार्गदर्शन करतांना, पक्षकारांचं कल्याण कशात आहे याचा विचार करुनच न्याय आपल्या दारी या संकल्पनेतुन इथे दिवाणी वरिष्ठ न्यायालयाची स्थापना केली असल्याचे सांगीतले.
न्यायमुर्ती मुकूलीका जवळकर यांनी मार्गदर्शन करतांना, जो पर्यंत प्रलंबीत खटले निकाली काढण्याच मनावर घेतल्या जाणार नाही. तो पर्यंत पक्षकारांच हित जपल्या जाणार नाही आणी न्याय आपल्या दारी हि संकल्पना पुर्णत्वास जाणार नाही असे सांगून, न्याय पक्षकारांच्या दारापर्यंत पोहचवीण्याकरीता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा वर्तवीली.
वर्धा जिल्हा सत्र न्यायाधीशी संजय भारुका यांनी मार्गदर्शन करतांना, शेरोशायरीचा वर्षाव करीत पाहुण्यांचे स्वागत केले. तर, आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत संताची भुमी असलेल्या आर्वी शहराची माहिती सुध्दा दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना, ॲड. अवतार गुरूनासिंगांनी यांनी मांडली. संचालन न्यायमुर्ती सेजवल काळे व आरती तवर यांनी संयुक्तपणे केले. तर आभार न्यायमुर्ती अमोल सुर्वे यांनी मानले. राष्ट्रगीत व राष्ट्र गाणने कार्यक्रमाची सांगता झाली.
ॲड. मंगेश करडे, ॲड. आर. के. गुरूनासिंगाणी, ॲड. रोहित राठी, ॲड. दिलीप माखीजा, ॲड. गनराज चव्हाण, ॲड. संजय तिरभाने, ॲड. मनुजा, ॲड. यु. आर. ढोणे, ॲड. मेश्राम, ॲड. जितेश काळबांडे, ॲड. स्वाती देशमुख, ॲड. शरद खोब्रागडे, ॲड. मालींद राऊत, ॲड. अविनाश चौधरी आदिंनी पाहुण्यांचे स्वागत केले
कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, वर्धा, आष्टी, कारंजा, आर्वी आदि तालुक्यातील न्यायाधिश, अधिवक्ता आदि मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी परिश्रम घेतले.