सार्वजनीक माहिती

आशा वर्कर आरोग्य संस्थेच्या कणा असुन समाजाच्या डॉक्टर आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पराडकर

संत भुमी टाकरखेडा येथे आश वर्कर्स कार्यशाळा

     आर्वी,दि.२७:- ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या आशा वर्कर ह्या आरोग्य संस्थेचा कणा असून समाजाच्या डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांनी  नियमित व्यायाम, संतुलित आहार,आजाराचे निदान व उपचार करुन तणावाचे नियोजन करावे आणी आपले आरोग्य सांभाळावे असा वर्धा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पराडकर यांनी संतभुमी टाकरखेडा येथे मार्गदर्शन करतांना सल्ला दिला.

श्री संत लहानुजी महाराज यांच्या १४१ व्या जयंती निमित्त, आमदार सुमित वानखेडे यांच्या सहकार्याने, इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वी व श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा यांच्या संयुकविद्यमाने आर्वी आष्टी कारंजा तालुक्यातील आशा वर्कर्सच्या  कार्यशाळेचे आयोजन टाकरखेडा येथे  करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन ते मार्गदर्शन करीत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अरुण पावडे हे होते. तर, संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे, उपाध्यक्ष वसंतराव महल्ले, संचालक अनासाने, प्रमुख मार्गदर्शक बालरोग तज्ञ डॉ सचिन पावडे, सेलू तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाडीभस्मे, स्त्रीरोग तज्ञ डॉ प्रतिभा पावडे, टिडीआरएफ चे संचालक हरिश्चंद्र राठोड, इंडियन रेड क्रॉस शाखा आर्वीचे उपाध्यक्ष राजाभाऊ तेलरांधे, सचिव डॉ अभिलाष धरमठोक, नंदकिशोर दिक्षीत आदी प्रमुख अतिथी होते.

यावेळी डॉ प्रतिभा पावडे यांनी, गरोदर स्त्रियांची सोनोग्राफी कशासाठी? केव्हा? व का करणे गरजेचे आहे यासंबंधी सविस्तर माहिती दिली

डॉ सचिन पावडे यांनी, वर्धा जिल्हा कुपोषण मुक्त करायचा असल्याचे सांगून, आशा वर्कर यांनी बाळाच्या आहाराकडे विशेष लक्ष दयावे व लसीकरण करताना कोणती काळजी घ्यावी या संबंधीची माहिती दिली.

डॉ प्रशांत वाडीभस्मे यांनी, आशा वर्कर यांचा जिवंत मनुष्य हा लाभार्थी असल्याचे सांगुन त्यांना मिळालेल्या या संधीचा लाभ घेऊन त्यांनी आरोग्य सेवेसाठी व समाजासाठी कार्य करावे अशी अपेक्षा वर्तवीली.

हरिश्चंद्र राठोड यांनी, आपत्तीमध्ये असलेल्या लोकांना भौतिक बाबी पेक्षाही मानसिक आधाराची गरज असल्याचे सांगुन, मानसिक आधार देण्यासाठी काय? करावे यासंबंधीची माहिती दिली. तसेच हृदय क्रिया थांबल्यानंतर हृदय पूर्ववत करण्याकरता आपत्कालीन प्रक्रिया सीपीआर हे प्रात्यक्षिकासह आशा वर्कर यांना समजून दिले.

तर, आशा वर्कर यांना श्री संत लहानुजी महाराज ‘स्तवनामृत’ व पल्स ऑक्सिमीटर भेट देण्यात आले

कार्यक्रमाचे प्रास्तावना डॉ. प्रा. अविनाश कदम यांनी मांडली, संचालन प्रेमसिंग राठोड यांनी केले तर आभार डॉ सतीश ठाकरे यांनी मानले

कार्यशाळाच्या यशस्वीत्तेकरीता इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे नवल किशोर अग्रवाल, प्रा हरिभाऊ वेरूळकर, प्रवीण शिरपूरकर, रमेश जवंजाळ, सुरेश काने,अरुण ढोक,प्रमोद पाटणी, किशोर चोरडिया,सुशील लाठीवाला, सुशील ठाकूर, प्रा अभय दर्भे, डॉ प्रमोद जाणे, अनिश चोरडिया, मोहन चांडक, श्री संत लहानुजी महाराज संस्थानाचे संचालक, कर्मचारी तथा लहानू अभ्यासिकेचे विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button