पुलाच्या बांधकामाचे खासदार अमर काळे यांच्या हस्ते भुमीपूजन आमदार सुमीत वानखेडे सुध्दा होते उपस्थीत
नागरिकांच्या वाढल्या अपेक्षा

आर्वी,दि.२७:- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या वर्ष २०२३-२४ अंतर्गत तिसऱ्या टप्प्यात कासारखेडा-मदना—मदनी रस्त्यावरील दोन पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असुन याचे भुमीपूजन खासदार अमर काळे यांच्या हस्ते पार पडले आहे. यावेळी आमदार सुमीत वानखेडे हे प्रामुख्याने हजर होते. यामुळे मात्र नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विधानसभेच्या विकास कामाला निश्चीतच गती मिळणार अशी अपेक्षा वाढली आहे.
कासारखेडा-मदना-मदनी राज्य मार्गवर दोन नद्या असुन पावसाळ्यात या नद्यांना मोठ्याप्रमाणात पुर येत असल्याने अवागमनाकरीता अडथळा निर्माण होत होता याची दखल घेतल्यामुळे शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत सा.क्र. १/८७० मधील पुला करीता एक कोटी ७३ हजार व सा.क्र.०/४१० मधील पुलाकरीता एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असुन या बांधकामाचे भुमीपूजन खासदार अमर काळे यांनी केले. तर, यावेळी आमदार सुमीत वानखेडे हे प्रमुख्याने उपस्थीत होते. याशिवाय पंचायत समितीचे माजी सभापती हरिभाऊ बोंद्रे, सरपंच किशोर अड्डे, मोहन खंगार, राजाभाऊ बोंद्रे तथा नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.
नागरिकांच्या वाढल्या अपेक्षा
पक्ष भेद व राजकीय विरोध सोडून खासदार अमर काळे व आमदार सुमीत वानखेडे हे भुमीपूजन कार्यक्रमाला एकत्र आल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. असेच एकदुसऱ्यावर टिकाटिप्पनी न करता सदोदित एकत्र येवुन काम केल्यास केंद्राचा असो अथवा राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास निधी विधानसभा क्षेत्रात येईल आणी विकासाला गती मिळेल अशी चर्चा असुन नागरिकांच्या अपेक्षा निश्चतीच वाढल्या आहेत.