मिताली पालीवाल फेसबुक अंकाऊट विरुध्द डॉ. धरमठोक यांची पोलीसात तक्रार डिग्री नसल्याची खोटी माहिती व धार्मीक तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप
मिताली पालीवाल अकाऊंट हाताळणार कोण?

आर्वी,दि.२१:- अल्पावधीत सहा हजाराच्यावर फॉलोअर झालेल्या मिताली फेसबुक अंकाऊट विरुध्द डॉ. अभिलाष धरमठोक यांनी येथील पोलीसात शुक्रवारी (ता.२१) तक्रार दाखल केली आहे. फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातुन एम डि ची डिग्री नसल्याची खोटी माहिती पसरवीली व विविध पोष्ट टाकुन धार्मीक तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. याची दाखल घेत पोलीसांनी गुन्हयाची नोंद घेवुन तपास सुरू केला आहे.
अवघ्या दोन महिण्यापुर्वी २० डिसेबर २०२४ ला अज्ञात व्यक्तीने निर्माण केलेल्या मिताली पालीवाल या फेसबुक अंकाऊटच्या माध्यमातुन राजकीय क्षेत्रातील नेत्यांवर, लोकांच्या धार्मीक भावनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्तांवर, भविष्यात येणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवुन समाज सेवेचे ढोंग करणाऱ्या नव्याने उगवलेल्या संधीसाधु समाज सेवकांच्या कार्यशैलीवर पोष्ट टाकुन आगळ्यावेगळ्या पध्दतीने घणाघात करण्याची हि पध्दत अनेकांना भावली तर दुसरीकडे यात अश्लील शब्दांचा वापर करुन धार्मीक भावनांवर वैय्यकतीक टिका केल्याने अनेक लोक दुखावले गेले. मात्र अल्पावधीतच हे फेसबुक अकाऊट लोकप्रीय झाले. पोष्ट टाकतांना खासदार, आमदार यांची सुध्दा गय केली नाही. असे असतांना सुध्दा ज्याने कुणी मिताली पालीवाल हा फेसबुक अंकाऊट हाताळला आहे त्याने पोष्ट टाकतांना कायदेशीर कचाट्यात सापडणार नाही याची पुरेपुर दक्षाता घेतली असल्याचे दिसुन येते. यात दुरून दुरून कटाक्ष टाकण्यात आले असल्याने त्याचेवर पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
मिताली पालीवाल अकाऊंट हाताळणार कोण?
मिताली पालीवाल हा फेसबुक अकाऊंट हाताळणाऱ्याने नागपुर हे ठिकाण टाकले असले तरी तो कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आपआपल्या पध्दतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले आहे. तक्रार दाखल होताच सायबर क्राईम पथकाच्या माध्यमातुन पोलीस फेस बुक अकाऊंट हाताळणाऱ्याचा शोध घेत असुन लवकरच त्याचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे त्याला पाहण्याकरीता नागरीक सुध्दा उत्सुक आहे.