बहुजन एम्पलॉइज फेडरेशन ऑफ इंडियांच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारीणीची बैठक

नागपुर,दि.१८:- बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी सदस्याची रवीवारी (ता.१६) नागपुर येथील आमदार निवास मध्ये बैठक झाली.
या बैठकीचे अध्यक्ष बहुजन एम्पलॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे हे होते. तर, राष्ट्रीय संघटन सचिव प्रा. डॉ. टी.डी.कोसे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा. शेषराव रोकडे, कोषाध्यक्ष प्रा. अशोक ठवळे, उपाध्यक्ष चैनदास भालाधरे, सचिव नरेश मुर्ती हे प्रमुख अतिथी होते.
या बैठकीत नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा आदि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने राबवीण्यात येत असलेल्या सदस्य मोहीमेचा आढावा सादर केला . तर, ही मोहीम मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येईल अशी घोषणा केली.
या कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र राज्याचे संघटन सचीव सिध्दार्थ डोईफोडे यांनी करुन आभार मानले.