दहावीच्या विध्यार्थ्यांचा भावपुर्ण निरोप संमारभ मान्यवरांनी केली बक्षीसांची घोषणा तर, एनसीसी कॅडेटचा केला सत्कार
एनसीसीच्या ५५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, दहावीच्या १४६ विद्यार्थ्यांना शाळेच्यावतीने परीक्षेकरिता रायटिंग पॅड आणि पेन गिफ्ट.

आर्वी,दि.१४:- येथील गांधीविध्यालय मधील दहावीच्या विध्यार्थ्यांना भावपुर्ण निरोप देण्यात आला तर, मान्यवरांनी यावेळी गुणानूक्रमे उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या विध्यार्थ्यां करीता बक्षीसांची घोषणा केली याशिवाय शालेय समाज सहभागाकरता त्यांनी आपले योगदान दिले. तसेच एनसीसी कॅडेटाचा सत्कार करण्यात आला. ९ व्या वर्गाच्या विध्यार्थ्यांनी गुरूवारी (ता.१३) हा कार्यक्रम आयोजीत केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकवालडकर हे होते तर, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अनील रक्ताडे, माजी प्राचार्य बाळकृष्ण केचे, उषाताई नागपुरे, माजी विध्यार्थी सुधीर शेंडे, प्राचार्य विश्वेश्वर पायले, पर्यवेक्षीका ज्योती अजमीरे हे प्रमुख अतिथी होते.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर, नवव्या वर्गातील विध्यार्थ्यांनी मुख्याधिकारी डॉ. किरणजी सुकलवाड यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली. एनसीसी चा दोन वर्षाचा कोर्स पुर्ण करणाऱ्या व अल्फा ग्रेट मिळवीणाऱ्या कु. श्रेया दुबे, कु. सई नागरे , निल घोडमारे, निशांत जोध, सुजल चव्हान, प्रथमेश राऊत, प्रिया पवार, पियुष झांबरे या विद्यार्थ्यांचा एनसीसीच्यावतीने सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परीक्षेकरीता पेन आणि परिक्षा पॅड भेट देण्यात आले तसेच एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी बक्षीसे देण्यात आली वर्ग नववी मधून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. सई प्रमोद नागरे हिला सुद्धा शाळेच्या वतीने बक्षीस दिल्या गेले.
शालेय समाज सहभागा करीता माजी प्राचार्य बाळकृष्ण केचे , उषाताई नागपूरे यांनी प्रत्येकी पाच, पाच हजार रुपये दिले. तर सुधीर शेंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र लॅमिनेशन करून दिले तसेच त्यांच्या वतीने दहाव्या वर्गामधून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावीणाऱ्या विध्यार्थ्यांना क्रमश: दोन हजार, एक हजार आणि पाचशे रुपये बक्षीस देत राहील अशी घोषणा केली. तर आठवीच्या विध्यार्थ्यांनी पाच हजार रुपये, आठवा ए टू च्यावतीने तिन हजार रुपये, नउव्या अ च्यावतीने सहा हजार सहाशे रुपये वर्ग नऊ ए२ च्यावतीने सात हजार पाचशे, वर्ग नऊ ब च्यावतीने तिन हजार पाचशे रुपयाचे धनादेश प्राचार्य पायले यांना देण्यात आले.
यावेळी कु. सई नागरे, हितेश शिरपूरकर, सोहम करतारी यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. कु. तुलना बोरेकर हिने सुंदर गीत गायले तर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कार्यक्रमाची प्रस्तावना टि. के. देशमुख यांनी मांडली. संचालन कु. इशिका कुरे, भक्ती रुद्रकार, सोहम शेलोकर यांनी केले तर आभार कु. खुशी बारबैले व आकांक्षा चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पर्यवेक्षिका अजमिरे यांनी गायलेल्या पसायदानातून झाली.