कार्यकारी अभियंत्याने दोनशे कोटी रुपयाचा निवेदा घोटाळा केल्याचा आरोप, बाळ जगताप यांच्या नेतृत्वात झाले ठिय्या, आंदोलन बेरोजगार अभियंत्यांनी डिग्रीच्या प्रती फेकुन केला निषेध
कार्यकारी अभियंत्यांनी बुट्टी मारण्याचा मार्ग स्वीकारला, कार्यकारी अभियंत्याच्या खोलीला डिजीटल लॉक, आवक जावक लिपीक संभाळतो व्यवहार

आर्वी,दि.११:- येथील सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोळंके यांनी दोनशे कोटी रुपयाचा निवेदा घोटाळा केल्याचा आरोप लावत प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळ जगताप यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.११) बेरोजगार अभियंत्यांनी ठिय्या आंदोलन केले आणी आपआपल्या डिग्रीच्या झेरॉक्स प्रती त्यांच्या बंद कॅबीन पुढे फेकुन निषेध केला. तर, उप कार्यकारी अभियंता लांजेवार यांनी आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
कार्यकारी अभियंता प्रशात सोळंके हे गत दोन वर्षा पासुन येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात कार्यरत आहे. त्यांच्या मनमानी कारभाराचे अनेक किस्से आहेत. ई-निवेदा पध्दतीने निवेदना दाखल केलेल्या पात्र कंत्रटदारांना चुकीची कारणे लावुन अपात्र ठरवीने आणी राजकीय नेत्यांच्या जवळील कंत्राटदाराला काम मिळवुन देण्यात त्यांचा हातखंडा असल्याचा आरोप सुध्दा लावल्या जात आहे.
नगर पालीका क्षेत्रातील व इतर असे एकुन दोनशे कोटीची कामे शासनाने मंजुर केली आहे. हि कामे सार्वजनीक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. यात आष्टी येथील टेकडीवाले बाबा दर्गाह दुरस्तीचे काम आहे. याकरीता वर्धा जिल्ह्यातील १२ कंत्राटदारांनी निवेदा भरल्या, मात्र कोणतेही कारण न देता त्यांच्या निवेदा फेटाळल्या आणी कार्यकारी अभियंता प्रशांत सोळंकी यांच्या मर्जीतल्या अमरावती येथील कंत्राटदाराला काम दिले. ऐवढेच नाही तर गत दोन वर्षा पासुन सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यांना कामेच वाटप केली नाही तर, त्यांची मिटींग सुध्दा बोलावली नाही. नियमानुसार ३३ टक्के कामे सुशीक्षीत बेरोजगार अभियंत्यांना आवंटीत करायला पाहिजे मात्र तसे केले नाही. सीएटी/२०२२/प्र.क्र.५०/इमा.२ या शासकीय आदेशानुसार एक कोटी पन्नास लाख रुपया पर्यंतच्या कामाकरीता कंत्राटदाराजवळ हॉट मिक्स प्लॅन्ट नसला तरी त्याला कामाचे आवंटन करता येते मात्र कार्यकारी अभियंता प्रशांत सोळंकी यांनी सुशीक्षीत बेराजागार अभियंत्यांना कामा पासुन वंचीत ठेवण्याकरीता ट्रायबल निविदा मागवीतांना चुकीच्या पध्दतीने व शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत हॉट मिक्सची अट टाकली परिणामी सुशिक्षीत बेरोजगार अभियंते कामा पासुन वंचीत राहिले. आठ दिवसाची मुदत असतांना आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला कामे मिळावी या उद्देशाने एक एक महिना निवीदा प्रकाशीत करण्याची यांची नवीच पध्दत आहे. अशा हिटलरशाही पध्दतीमुळे संतप्त झालेल्या सुशीक्षीत बेरोजगार अभियंत्यांनी प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळ जगताप यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. व उप कार्यकारी अभियंता लांजेवर यांना निवेदन दिले. या बाबत महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. प्रश्न विरोधी पक्षनेत्यांकडे सुध्दा जाण्याची शक्यता बळावली आहे.
आंदोलन कर्त्यामध्ये प्रहार सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांसह सुशीक्षीत बेराजेगार अभियंत्यांचा समावेश होता.
कार्यकारी अभियंत्यांनी बुट्टी मारण्याचा मार्ग स्वीकारला
कार्यकारी अभियंता प्रशांत सोळंकी यांना आठ दिवस पुर्वी पासुन आंदोलनाची माहिती होती. त्यांना प्रश्न सोडवायचा असता तर त्यांनी आधीच बैठक लावुन मार्ग काढला असता मात्र राजकीय क्षेत्रातील बड्या नेत्यांचा त्यांना वरदस्त असल्यामुळे त्यांनी या आंदोलनाला हलक्यात घेतले आणी आंदोलन कर्त्यांच्या प्रश्नाला पुढे न जाता बुट्टी मारण्याचा सोयीस्कर मार्ग स्वीकारला.
कार्यकारी अभियंत्याच्या खोलीला डिजीटल लॉक
अख्या महाराष्ट्रातील कार्यकारी अभियंताच नव्हे तर, मंत्र्यांच्या खोलीला सुध्दा डिजीटल लॉक असल्याचे पाहण्यात आले नाही मात्र येथील कार्यकारी अभियंता प्रशांत सोळंकी यांनी आपल्या कार्यालयीन खोलीला डिझीटल लॉक बसवीला आहे. त्यांना सिसिटीव्हीच्या माध्यमातुन भेटायला आलेल्या व्यक्तीची लगेच माहिती मिळते मात्र ते त्यांना तासंतास बसवुन ठेवतात. परंतु मलीदादार कंत्राटदार आला तर त्याला लगेच आत बोलावत या डिजीटल लाकचा पासवर्ड कार्ड शिपाया जवळ असते.
आवक जावक लिपीक संभाळतो व्यवहार
कार्यकारी अभियंता कार्यालयातील आवक जावक लिपीक त्यांच्या फार जवळचा असल्याचे कळते. तोच त्यांचा आत बाहेरचा व्यवहार सांभाळतो. कोणाच्या निविदेचे दस्ताऐवज स्वीकारायचे, कुणाला निवीदेचा अर्ज द्यायचा, की नाही द्यायचा हे सर्व त्याच्याचकडे असल्याची जोरदार चर्चा आहे.