अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी केला सामुहीक बलात्कार
इंस्टाग्रामवर झाली होती ओळख आणी इतरांनी केला जबरदस्तीने बलात्कार, पोलीस अधिक्षकांनी भेट देवुन घेतली माहिती

आर्वी,दि.११:- येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीलाला तिच्या मित्रासोबत दुचाकीवर जातांना पाहताच त्यांचा पाठलाग करत आरोपी गेले व त्यांनी पिडीतेच्या मित्राला हुसकावुन लावून जबरदस्तीने बलात्कार केला. हि घटना पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी (ता.१०) रात्री घडली. या प्रकरणातील पाचही आरोपी अटकेत आहे.
प्रणय बुलबुले (१९ वर्ष), शुभम लाडके (१९), शिवम सारसर (२७), अक्षय पारवे (२२) सर्व राहणार आर्वी, आणी एक अल्पवयीन मुलगा अशी आरोपींची नावे आहेत.
पिडीत अल्पवयीन मुलगी दहाव्या वर्गात नापास झाल्यापासुन घरीच राहते. तिचे जवळ रेडमी कंपनीचा मोबाईल आहे. ती इंस्ट्राग्रामचा वापर करते. या माध्यमातुन एक अल्पवयीन मुलगा तिच्या संपर्कात आला. त्याच्या सोबत प्रेमाचे संबंध निर्माण झाले. सोमवारी (ता.१०) संध्याकाळच्या सुमारास तो आला. त्याने पिडीत मुलीला दुचाकीवर बसवीले आणी पोलीस स्टेशन हद्दी मधील नोतवाईकाच्या घरी नेले. घरात कुणीच नसल्याची संधी साधत त्याने बळजबरीने तिचे सोबत शारीरीक संबंध प्रस्थापीत केला. काही वेळे नंतर घराच्या दारावर जोरजोरात थापा पडु लागल्या अल्पवयीन मुलाने दार उघडाताच प्रणय बुलबुले व त्याचे तिन साथीदार घरात शिरले त्यांनी अल्पवयीन मुलाला हुसकावुन लावले आणी जबरदस्तीने तिचे वर आळीपाळीने बलात्कार केला. काही वेळे नंतर पिडीत मुलीला नराधमांच्या तावडीतून सोडवीण्याकरीता अल्पवयीन मुलगा चार पाच मित्रांना सोबत घेवुन घटनास्थळी आला. त्यांना पाहताच आरोपींनी पळ काढला. त्यानंतर अल्पवयीन मुलाने पिडीतेला घरी सोडून दिले. हि माहिती पिडीतेने आईला सांगीतले व येथील पोलीसात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलीसांनी आरोपींविरुध्द बी.एन.एस. च्या कलम १३७(२), ६४(१), ७०(२) व सहकलम ४,६ पास्को अन्वये गुन्ह्याची नोंद घेवुन ठाणेदार सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू केला आणी अवघ्या काही तासातच आरोपींना ताब्यात घेतले. तपास पोलीस उपनिरीक्षक सुचीता मडवाले ह्या करीत आहे
पोलीस अधिक्षकांनी भेट देवुन घेतली माहिती
पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी तातडीने आर्वी पोलीस स्टेशन गाठुन सामुहीक बलात्कार प्रकरणाची संपुर्ण माहिती घेतली आणी पुढील तपासाकरीता अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.